आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • E check Will Be Chief Minister's Hands Start App

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ई-तपासणी अॅपला प्रारंभ,पुरवठा विभागाचे नवे अॅप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्वस्तधान्य दुकानांमध्ये होणारा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानांची ऑनलाइन तपासणी करण्यासाठी ई-तपासणी नावाचे अॅप सुरू केले आहे. या अॅपचे उद्घाटन येत्या मंगळवारी (२७ ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
स्वस्त धान्य दुकानांना शासनामार्फत दिले जाणाऱ्या धान्याचे वाटप नियमाप्रमाणे होत नसल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडे येत असतात. या तक्रारीनंतर पुरवठा विभागातील अधिकारी संबंधित दुकांनामध्ये जाऊन मालाची तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करतात. या अहवालानंतर वरिष्ठ अधिकारी त्या दुकानाचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करतात. या प्रक्रियेमध्ये बराच कालावधी जातो.
त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानांची तपासणी ऑनलाइन पध्दतीने करण्यासाठी ई-तपासणी नावाचे अॅप विकसित केले आहे. पुरवठा अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, तालुका पुरवठा निरीक्षक, जिल्हा पुरवठा विभागातील निरीक्षक यांच्या स्मार्टफोनमध्ये ई-तपासणी नावाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यात येणार आहे. तपासणीसाठी दुकानात गेल्यावर अधिकाऱ्यांनी आपले सॉफ्टवेअर सुरू करायचे आहे. त्यासाठी लॉग-इन आयडी पासवर्ड दिला जाणार आहे.

या ई-तपासणी अॅपचे उद््घाटन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगर दौऱ्यात होणार आहे. नगर जिल्ह्यात १० लाख ५६ हजार शिधापत्रिकाधारक असून, हजार ८५२ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या अॅपमुळे पुरवठा विभागाचा वेळ पैसा वाचणार आहे.


पुरवठा विभागाची तयारी
स्वस्तधान्य दुकानांच्या ई-तपासणी अॅपचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करावे, यासाठी त्यांच्या कार्यालयाला जिल्हा प्रशासनाने विनंती केली आहे. अॅपच्या लाँचिंगची जिल्हा पुरवठा विभागाने तयारी केली आहे. या अॅपचा अधिकाऱ्यांना चांगला उपयोग होऊ शकेल.'' जितेंद्रवाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी, नगर.