आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Early Morning Theft In Shops Of Shivajinagar Area

शिवाजीनगर परिसरात पहाटे फोडली दुकाने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडून कपडे, रोकड, कॅमेरा, मोबाइल असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. एकाच वेळी पाच दुकाने फोडल्याने खळबळ उडाली आहे. तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत.

नगर कल्याण रोडवरील शिवशंकर कॉम्प्लेक्समधील मधुर लस्सी, सुदर्शन गारमेंट आणि कोहिनूर ट्रेडिंग कंपनी या दुकानाचे शटर अज्ञात चोरांनी लोखंडी गजाने उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील कपडे, रोकड, असा ऐवज चोरून नेला त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा जवळच असलेल्या मुदगल वस्तीकडे वळवला. मुदगलवस्तीमध्ये मुख्य रस्त्यालगत असलेल्या पूनम फोटोज, महालक्षी बँगल्स या दुकानाचे शटर उचकटून आतील कॅमेरा, मोबाइल रोख रक्कम बेन्टेक्स बांगड्या असा ऐवज चोरून नेला. त्यांनतर चोरांनी जवळच असलेल्या बालाजी कॉलनी येथील एका घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून चोरी केली. त्यानंतर हे चोरटे पसार झाले. या सर्व दुकानांमधून सुमारे लाखांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे प्रथम दर्शनी पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी श्वानपथक पाचारण केले. आरोपींनी अलिशान वाहनाचा वापर केल्याने श्वान झोपडी कॅन्टीनजवळच घुटमळले. कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये पहाटेच्या सुमारास चोरी करताना तिघे चोरटे कैद झाले आहेत. पोलिसांनी तपासाकरिता फुटेज मिळवले आहे. त्यानुसार पोलिसांना आरोपी शोधण्यास मदत होणार आहे.
नगर-कल्याण महामार्गावरील जाधव पेट्रोलपंपासमोर शनिवारी पहाटे चोरट्यांनी पाच दुकाने फोडली.