आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांमध्ये सुशिक्षित तरुणांच्या संख्येत वाढ - विधिज्ञ उज्ज्वल निकम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - दहशतवाद्यांमध्ये सुशिक्षित तरुणांची वाढती संख्या देशापुढे चिंतेचा विषय आहे. भारतातील धार्मिक ऐक्य नष्ट करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असून त्यापासून नागरिकांनी सावध राहावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले.
शहरातील श्रीछत्रपती शिवाजी विद्यालयात शनिवारी दुपारी माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थांनी
सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर होनराव होते. प्रारंभी निकम यांच्या हस्ते नागवडे यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री शंकरराव कोल्हे उपस्थित होते.
अ‍ॅड. निकम म्हणाले, दहशतवाद का वाढतो, याची कारणे शोधताना बेकारी, दारिद्र्य, अज्ञान व वाढती लोकसंख्या ही कारणे सांगितली जातात. मात्र, अलीकडे दहशतवादी कारवायात सुशिक्षितांची संख्या वाढत आहे.
दहशतवादाच बीमोड करण्यासाठी प्रचलित कायदे पुरेसे आहेत. धर्माची चुकांची सांगड घातल्याने दहशतवाद्यांना बळ मिळत आहे. देशातील धार्मिक सलोखा नष्ट करणे, हे दहशतवाद्यांचे उद्दिष्ट असल्याने जनतेने त्यांच्या हेतूपासून सावध राहायला हवे. निकम म्हणाले, कसाबला गुप्तपणे फाशी दिल्याचा माध्यमांनी वेगळा अर्थ लावला. खरेतर एखाद्याला फाशी देताना ती सार्वजनिक करून विकृत आनंद घेणे, ही आपली संस्कृती नाही.