आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Education Material Distribution In Pathardi News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गिते पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - लोहसर (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला 25 वर्षे पूर्ण झाली. शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना मुलांना शैक्षणिक साहित्य वाटण्याचा उपक्रम जगन्नाथ गिते सामाजिक प्रतिष्ठान राबवत आहे. गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांच्या हस्ते 21 जून रोजी शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपसरपंच तथा जगन्नाथ गिते पाटील सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल गिते, रावसाहेब वांढेकर, सुरेश चव्हाण, मनसुख दगडखैर यांच्यासह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. कराड म्हणाले, पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून पालक कोणत्याही शाळेमध्ये पाठवण्यास तयार असतात. त्यामुळे शिक्षण विभागानेच आता मुलांसाठी दर्जेदार शिक्षण आणि ते ही मोफत देण्याची सोय केली आहे. त्यामुळे तालुक्यात 178 शाळांमधून सेमी इंग्रजीचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली. लोहसर येथे आजपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहे. गिते प्रतिष्ठानसारख्या संस्था सामाजिक कार्याद्वारे शालेय विद्यार्थ्यांना संगणक, शौचालय, स्वच्छता व अभ्यासाची आवड निर्माण व्हावी म्हणून मदत करत असते. लोहसर, पोवळवाडी व खांडगाव येथील मुलांना शैक्षणिक मदत व विविध उपक्रमांचे मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करत असते. त्यामुळे ‘माझे गाव, माझी शाळा’ ही संकल्पना आता ‘माझे आदर्श गाव, माझी आदर्श शाळा’ लोहसर येथे होत असल्याचे कराड म्हणाले.

अध्यक्ष अनिल गिते यांनी प्रतिष्ठान सामूहिक लग्न, गरिबांच्या लग्नामध्ये सात हजारांची मोफत भांडी, स्त्री जन्माचे स्वागत, ठेव योजना आदी योजना राबवत आहे. यावेळी प्राथमिक शाळेस तीन संगणक मोफत देणार आहे, असे सांगितले. यावेळी केंद्रप्रमुख देविदास ससे, मुख्याध्यापक विमल सावंत, मधुकर साठे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मदन अकोलकर यांनी केले. आभार रवींद्र जोशी यांनी मानले.
(छायाचित्र - लोहसर (ता. पाथर्डी) येथे जगन्नाथ गिते पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मुलांना मोफत वह्या व शालेय साहित्याचे वाटप करताना गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, उपसरपंच अनिल गिते)