शेवगाव- येथील नानासाहेब भारदे इंग्लिश स्कूलचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी श्रीनाथ सुधीर कंठाळी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
अहमदनगर येथील सहकार सभागृहात झालेल्या गुणगौरव समारंभात ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर,ज्येष्ठ मराठी साहित्यिक व कवी नारायण सुमंत, ‘टिंग्या’फेम शरद गोयेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन श्रीनाथला गौरवण्यात आले. श्रीनाथच्या या यशाबद्दल आमदार चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे उपसभापती अरूण लांडे, रमेश भारदे, एकनाथ कंठाळी गुरूजी, गट विकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, मुख्याध्यापक गणपत दसपुते आदींनी त्याचे अभिनंदन केले. त्यास मुख्याध्यापिका परवीन काझी, वडील सुधीर कंठाळी यांचे मार्गदर्शन लाभले.