आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Educational News In Marathi, Students Saw Space From Space Telescope, Divya Marathi

विद्यार्थ्यांनी प्रथमच पाहिले दुर्बिणीने अवकाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगरच्या ‘व्हर्सटाइल’ खगोलशास्त्राचा अभ्यास करणार्‍या हौशी ग्रूपच्या मदतीने नेवासे तालुक्यातील झापवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी दुर्बिणीद्वारे अवकाश पाहिले.

शनिवारी रात्री इयत्ता पाचवी ते सातवीच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांनी याची देही याचि डोळा ग्रह तार्‍यांचा अभ्यास केला. व्हर्सटाइल ग्रूपचे तुषार वैद्य आणि पंकज विश्वासराव यांनी ग्रामीण या भागातील विद्यार्थ्यांना अवकाशाची माहिती दिली. यावेळी झापवाडीच्या सरपंच वर्षा काळे, उपसरपंच माऊली जरे, माजी सरपंच शशिकांत वाघ, विठ्ठल काळे, आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्विततेसाठी झापवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सहादू चेमटे, केंद्रप्रमुख अरुण दळवी, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे, शिक्षक किशोर हारदे, दत्ता ठुबे, शरद खंडागळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू जरे आदी प्रयत्नशील होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रथमच दुर्बिणीच्या मदतीने आकाशातील ग्रह-तारे पाहण्याचा अनुभव घेतला.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या ‘ग्रह आणि तारे यामधील फरक, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण कसे होते, पृथ्वीसह आणखी कोणत्या ग्रहांवर जीवसृष्टी आहे, दिवसा चंद्र किंवा इतर ग्रह डोळ्यांना का दिसत नाहीत’ या आणि इतर शंकांचे वैद्य आणि विश्वासराव यांनी निरसन केले. तारांगणात जाऊन खगोलशास्त्राचा अभ्यास करणे हे ग्रामीण विद्यार्थ्यांना परवडत नाही. म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. आभार शरद खंडागळे यांनी मानले.