आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ तास वीज खंडित; पाणीपुरवठा विस्कळीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी वीजपुरवठा करणार्‍या वीज वाहिनीला कंटेनरची धडक बसल्याने तब्बल आठ तास वीजपुरवठा खंडित झाला. याचा फटका शहरातील पाणीपुरवठय़ाला बसला आहे. शनिवारी (25 जानेवारी) शहराच्या काही भागास उशिराने व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे.
शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा योजनेला वीजपुरवठा करणार्‍या वीज वाहिनीला (बुस्टर) कंटेनरची धडक बसली. यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. विजेअभावी विळद येथून होणार्‍या पाण्याचा उपसा बंद असल्याने पाण्याच्या टाक्या भरता आल्या नाहीत. यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शनिवारी रोटेशननुसार शहराच्या काही मध्यवर्ती भागासह निर्धारित वेळेपेक्षा उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
वीजपुरवठा सुरळीत
पहाटे झालेल्या अपघातामुळे महावितरण कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन कामास सुरुवात केली. वीज वाहिनी तुटली असल्याने हे काम पूर्ण होण्यास वेळ लागला. दुपारी बारा वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.’’ जी. जे. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, महावितरण.