आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Eight Tigers Dead In Maharashtra During Last Five Months

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात पाच महिन्यांत आठ वाघांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- देशात अवघ्या पाच महिन्यांत 39 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 16 वाघांची शिकार झाली आहे. एकूण मृत्यूपैकी आठ वाघांचा मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाला आहे, अशी माहिती वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया या वाघांसाठी काम करणार्‍या अग्रगण्य संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
सन 2011 मध्ये वर्षभरात फक्त 61 वाघांचा मृत्यू झाला होता. वाघांच्या मृत्यूचे प्रमाण घटल्याबद्दल सरकारी यंत्रणांनी दिलासा व्यक्त केला होता. या वर्षी पहिल्या पाच महिन्यांतच 39 वाघांचा मृत्यू झाल्याने तो तात्पुरता ठरला आहे. ताडोबा जंगलाच्या बफर क्षेत्रात गेल्या महिनाभरात दोन वाघांची शिकार झाली. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला व दुसर्‍या वाघाचा पाय कायमचा जायबंदी झाल्याची माहिती वन्यजीव विभागाच्या सूत्रांकडून समजली.

वाघ असुरक्षित

वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (डब्ल्यूआयआय) तज्ज्ञांनी अत्याधुनिक पद्धतीने केलेल्या सन 2010 च्या व्याघ्र गणनेनुसार राज्यात 161 ते 193 वाघ आहेत. या वर्षी वाघांची मोठय़ा प्रमाणात वीण होऊन फक्त विदर्भातच 60 ते 70 बछडे असल्याची माहिती समजली. हे बछडे मोठे झाले की बफर किंवा थेट प्रादेशिक वनांत जातात. ते तेथे असुरक्षित राहतात. राज्यात राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांबरोबरच विदर्भात प्रादेशिक वनांतही वाघांची वीण होत आहे.


वाघ वाचविण्‍यासाठी
- वाघाचे अस्तित्व हा राज्याच्या इभ्रतीचा प्रश्न समजावा. म्हणजे वाघावरील हल्ला हा राज्याच्या अस्मितेवरील हल्ला समजून यात मुख्यमंत्र्यांनीच तातडीने दखल घेण्याची गरज.

- राज्यातील सर्व वरिष्ठ व संबंधित अधिकार्‍यांना बोलावून त्यांना आरोपी पकडण्यासाठी कालर्मयादा ठरवून देण्याची गरज.

- कोणतीही व्यवस्था निर्माण करा; पण शिकारी जंगलात पाय ठेवू शकणार नाहीत, अशी स्थिती निर्माण करण्याच्या या अधिकार्‍यांना सूचना देण्याची आवश्यकता.

- शिकारीच्या किंवा वन गुन्ह्यांच्या तपासात वन विभागाच्या र्मयादा उघड. त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासात पोलिस, सीआयडी, सीबीआय अशा यंत्रणांची मदत घेणे.

- वन खात्यानेही तपासासाठी कुशल व प्रशिक्षित अधिकारी-कर्मचार्‍यांची यंत्रणा उभी करणे आवश्यक.