आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Notice To Gandhi And Rajale, Divya Marathi

गांधी, राजळे यांना निवडणूक आयोगाची नोटीस, खर्चात पुन्हा आढळली तफावत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने निवडणूक आयोगाने काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे, भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्यासह अपक्ष उमेदवार बी. जी. कोळसे, अजय बारस्कर, आम आदमी पक्षाच्या दीपाली सय्यद यांना पुन्हा नोटिसा पाठवल्या आहेत. यापूर्वीही त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.48 तासांच्या आत खुलासा मागवण्यात आला आहे.
राजळे यांनी आत्तापर्यंतचा 25 लाख 47 हजार 992 रूपयांचा खर्च सादर केला आहे. या खर्चात 1 लाख 60 हजार 678 रुपयांची तफावत आढळल्याने निवडणूक आयोगाने राजळे यांना दुसर्‍यांदा नोटीस बजावली आहे. दिलीप गांधी यांनी 8 लाख 13 हजार 799 रूपये खर्च सादर केला. त्यात 2 लाख 5 हजार 250 रूपयांची तफावत आढल्याने त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. कोळसे यांनी 5 लाख 45 हजार 67 रूपये खर्च सादर केला. त्यात 24 हजार 185 रूपयांची तफावत आढळली. दीपाली सय्यद यांनी सादर केलेल्या 1 लाख 88 हजार रुपये खर्चात 24 हजार 547 रूपयांची तफावत आढळली.
यापूर्वी राजळे यांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात 6 लाख 92 हजारांची तफावत आढळल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. गांधी, सय्यद व कोळसे यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. शिर्डी मतदारसंघातील भाऊसाहेब वाकचौरे, सदाशिव लोखंडे, नितीन उदमले व संतोष रोहम यांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.