आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेवाशातही मतदारांचा उत्साह, तीन बाजार समित्यांसाठी झाले विक्रमी मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - किरकोळप्रकार वगळता श्रीरामपूर, नेवासे शेवगाव बाजार समित्यांसाठी शांततेत मतदान झाले. श्रीरामपूर बाजार समितीसाठी ९८.५०, नेवासे बाजार समितीसाठी ९७.५७, तर शेवगाव बाजार समितीसाठी ९६ टक्के अशी विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.
श्रीरामपूरमध्ये ९८.५० % मतदान
कृषीउत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी ९८.५० टक्के मतदान झाले. बेलापूर येथे केंद्राबाहेर जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन सभापती शरद नवले सोसायटी मतदार संघाचे उमेदवार सुधीर नवले यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण आणले. त्यानंतर दोन्ही गटांचे समर्थक निघून गेल्याने वादावर पडदा पडला. याशिवाय तालुक्यात निवडणूक शांततेत पार पडली.

तालुक्यात बेलापूर येथील जे. टी. एस. हायस्कूल, टाकळीभान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच शहरातील जूने तहसील कार्यालयात मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. १८ जागेसाठी ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोसायटी मतदारसंघात ११ जागांसाठी २८, ग्रामपंचायतीच्या जागांसाठी ९, व्यापारी मतदारसंघाच्या जागांसाठी ७, तर हमाल मापाडी मतदारसंघाच्या जागेसाठी असे ५२ उमेदवार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक एस. डी. सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

शेवगावसमितीसाठी ९६ टक्के मतदान
शेवगावबाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या २३६८ पैकी २२७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार चंद्रशेखर घुले नरेंद्र घुले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-कम्युनिस्ट-आरपीआय यांच्या ज्ञानेश्वर शेतकरी मंडळ माजी आमदार राजीव राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस यांच्या शेतकरी विकास आघाडीत सरळ लढत झाली. १८ जागासाठी ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोसायटी मतदारसंघ ग्रामपंचायत मतदारसंघासाठी शेवगाव बोधेगाव ढोरजळगाव, खानापूर देवटाकळी अशी पाच, तर व्यापारी हमाल मापाडी मतदारसंघासाठी शेवगाव बोधेगाव अशा दोन मतदार केंद्रांवर मतदान झाले. सोसायटी मतदारसंघात ९२३ पैकी ८८७, ग्रामपंचायत मतदारसंघात ७९८ पैकी ७५१, व्यापारी आडते-२७१ पैकी २०७, हमाल मापाडी ३८१ पैकी ३७१ मतदारांनी मतदान केले.
तालुकाकृषी उत्पन्न बाजार समितीसाठी चुरशीची निवडणूक असल्याने मोठ्या उत्साहात विक्रमी ९७.५७ टक्के मतदान झाले. एकूण ३२६३ मतदारांपैकी ३१८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी नेवासे बाजार समीतीत रविवारी (१० ऑगस्ट) होणार आहे.

विधानसभेतील विजयानंतर तालुक्यात आमदार बाळासाहेब मुरकुटे प्रत्येक निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख यांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळा कारखाना, जिल्हा सहकारी बँक, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत बाळासाहेब मुरकुटे यांनी लक्ष घालून विरोध तीव्र केला. त्याचप्रमाणे बाजार समितीत ही त्यांनी सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रथमच घुले, गडाखांच्या पॅनलविरुद्ध संपूर्ण पॅनल उभे करण्यात आमदार मुरकुटे यांना यश आले. निवडणुकीत १८ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात होते. यापैकी पाच अपक्ष उमेदवारांनी आमदार मुरकुटे यांच्या पॅनलला पाठिंबा दिला. निवडणुकीसाठी ठिकाणी मतदानाची सोय केली होती. व्यापारी हमाल मापाडींचे मतदान घोडेगावला झाले. त्यात व्यापारीमध्ये ४२८ पैकी ४११, हमाल मापाडी ६७ पैकी ६७ म्हणजे १०० टक्के मतदान झाले. सोसायटी मतदारसंघात झालेले मतदान- नेवासे ४०१ पैकी ३९०, घोडेगाव ३३६ पैकी ३२७, कुकाणे २९४ पैकी २८९, चांदा १२८ पैकी १२६, सलाबतपूर २९४ पैकी २८४, वडाळा २२८ पैकी २२२ मतदारांनी मतदान केले. एकूण मतदान -सोसायटी १६८२ पैकी १३११. ग्रामपंचायतीला झालेले मतदान - नेवासे २८८ पैकी २८३, घोडेगाव २२१ पैकी २१९, कुकाणे १९६ पैकी १९१, चांदा ८६ पैकी ८४, सलाबतपूर १७३ पैकी १७३, वडाळा १२२ पैकी ११९ मतदारांनी मतदान केले.