आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरप्रदेशातून येणार 5400 ईव्हीएम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी उत्तरप्रदेशातून 5 हजार 400 ईव्हीएम (मतदान यंत्रे) मागवण्यात येणार असून, येत्या 31 जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. उपनिवडणूक अधिकारी सुनील माळी यावेळी उपस्थित होते.

गेल्या लोकसभा निवडणुकीत 2006 च्या पूर्वीच्या ईव्हीएम मशीनचा वापर केला गेला होता. आता 2006 नंतरच्या ईव्हीएम मशीनचा वापर विधानसभा निवडणुकीत केला जाणार आहे. उत्तरप्रदेशातून एकूण 5 हजार 400 ईव्हीएम मशीन येणार आहेत. अमेठी येथून 3500, बागपत येथून 900 व रायबरेलीतून 1000 मशीन येतील, असे कवडे यांनी सांगितले.

कवडे पुढे म्हणाले, गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदार नोंदणी 12 टक्क्यांनी वाढली आहे. 9 ते 30 जून या कालावधीत नगर शहर व जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात आला. त्याला अपेक्षित तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. महिला मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असल्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून महिलांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. मतदार नोंदणीत वाढ व्हावी, यासाठी सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. 2011 च्या जनगणनेच्या यादीनुसार महिलांची नावनोंदणी होणे अपेक्षित आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील सैनिकांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी 10 केंद्रस्तरीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत 615 सैनिकांचे मतदार नोंदणीचे अर्ज आले आहेत.