आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचार साहित्याच्या छपाईवरील बंधने पाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नि‍वडणुकीत पत्रि‍का, भि‍त्तीपत्रके आदींच्या छपाईवरील बंधनांचे संबंधि‍तांनी पालन करावे, अशी सूचना जि‍ल्हा नि‍वडणूक अधि‍कारी तथा जि‍ल्हाधि‍कारी अनि‍ल कवडे यांनी सोमवारी दिली.
मुद्रणालय मालकांची बैठक जि‍ल्हाधि‍कारी कार्यालयात आयोजि‍त करण्यात आली होती.
त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपजि‍ल्हा नि‍वडणूक अधि‍कारी सुनील माळी उपस्थि‍त होते. कवडे म्हणाले, नि‍वडणूक पत्रि‍का, भि‍त्तीपत्रके यांची छपाई करणे व प्रसि‍ध्द करणे यासाठी लोकप्रति‍नि‍धीत्व अधि‍नि‍यमाद्वारे काही बंधने घालण्यात आली आहेत.
दर्शनी भागावर मुद्रक आणि‍ प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल, असे कोणतेही नि‍वडणूक पत्रक, भि‍त्तीपत्रक मुद्रित व प्रकाशि‍त करता येणार नाही. कोणताही दस्तऐवज धर्म, पंथ, जात, समाज अथवा भाषा अथवा वि‍रोधकाचे चारि‍त्र्यहनन आदी कारणांमुळे बेकायदेशीर व क्षोभ नि‍र्माण करणारा असेल, तर शि‍क्षात्मक अथवा प्रति‍बंधात्मक कारवाई करण्यात येईल. तालुकास्तरावर मुद्रकांची बैठक नि‍वडणूक नि‍र्णय अधि‍कारी घेतील. नि‍यमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई होईल, असेही कवडे यांनी सांगितले.