आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Seat Issue In Bjp And Shivsena In Nagar City

शिवसेना व भाजपमध्ये अजूनही दुरावा कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिवसेनेच्या प्रचाराकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने मनपा, लोकसभा व आता विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांमधील दुरावा कायम राहण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेने विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार नगरमध्ये आमदार अनिल राठोड यांना उमेदवारी मिळणार आहे. घोषणा होण्यापूर्वीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. मनपा निवडणुकीत शिवसेना-भाजपमधील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. लोकसभा निवडणुकीतही भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचाराकडे शिवसेनेच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती.आता विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराकडे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शुक्रवारी आमदार राठोड यांनी प्रचाराला सुरुवात केली. भाजपचे भय्या गंधे, नरेंद्र कुलकणी, नितीन शेलार वगळता अन्य नेत्यांनी तिकडे पाठ फिरवली.

निमंत्रण नव्हते...
शिवसेनेने प्रचाराचे िनमंत्रण खासदार, भाजप शहर जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष यांना दिले नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या प्रचारासाठी गेलो नाही. नगरच्या जागेबाबतचा भाजपचा आग्रह कायम आहे. वृत्तपत्रांत वाचल्यानंतर आम्हाला शिवसेनेचा प्रचार सुरू झाल्याचे समजले.”
अनिल गट्टाणी, उपाध्यक्ष, भाजप