आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारनियमनमुक्ती उरली कागदावरच; गिझर, शेगडी, कृषिपंपांसाठी होतेय विजेची चोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- संपूर्ण राज्य भारनियमनमुक्त झाले, असा डांगोरा राज्य सरकार व महावितरणने डिसेंबर 2012 मध्ये पिटला. मात्र, ही भारनियमनमुक्ती प्रत्यक्षात नव्हे, तर कागदावरच झाली असल्याचे खुद्द महावितरणकडूनच उघड झाले आहे. राज्य पुन्हा नव्याने भारनियमनमुक्त करण्यासाठी परिमंडळनिहाय ‘भारनियमनमुक्त गावांची संकल्पना’ राबवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी गिझर, शेगडी, कृषिपंप, खडीक्रशरसाठी आणि औद्योगिक वसाहतींमध्ये आकडे टाकून विजेचा चोरून वापर करण्यात येतो. ज्या गावांमध्ये वीजहानी मोठय़ा प्रमाणावर आहे, अशा गावांमध्ये ‘भारनियमनमुक्तीतून समृध्दी’कडे या संकल्पनेंतर्गत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ‘भारनियमनमुक्त गाव ही स्वाभिमानाची बाब व प्रगतीचे लक्षण आहे,’ याबाबत जगजागृती करत आहेत.

सध्या मुबलक वीज उपलब्धत आहे. यामुळे जिल्ह्यात कुठेही भारनियमन नाही. दोन महिन्यांपूर्वी मुकुंदनगर, सिध्दार्थनगर भागांमध्ये विजेची थकबाकी वाढल्यामुळे सहा ते तास तासांचे भारनियमन सुरू होते. ग्रामीण भागात अ, ब, क, ड या वर्गीकरणानुसार 5 ते 6 तास, 8 ते 10 आणि 12 ते 14 तास भारनियमन होते. आता ग्रामीण भागातही भारनियमन बंद आहे, असे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी सांगितले.

वीजचोरी तेथे भारनियमन
अ, ब, क, ड भागातील वीजग्राहक भारनियमनमुक्तीचा आनंद घेत आहेत. मात्र जेथे वीजचोरी व वीजहानी जास्त आहे. तेथील ग्राहकांना भारनियमन सहन करावे लागत आहे. रितसर वीजजोड घेतल्यास वीज गळती टाळता येते. वीजचोरीमुळे प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होतो म्हणून प्रामाणिक ग्राहकांनी वीजचोरांना अटकाव केल्यास वीजचोरी होणार नाही. वीज ग्राहकांनी नियमित वीज बिले भरल्यास भारनियमनमुक्ती सहज शक्य आहे, असे महावितरणचे म्हणणे आहे.

सरपंच व ग्रामस्थांना मार्गदर्शन
नाशिकचे दोघे कर्मचारी, नगरचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गोरे, उपकार्यकारी अभियंता पी. आर. सावंत, सहायक अभियंता एस. आर. व्यास यांचे पथक प्रत्येक गावात जाऊन सरपंच व ग्रामस्थांना मार्गदर्शन करते. भारनियमनमुक्त गावांची संकल्पनेची माहिती यावेळी दिली जाते.
- धनंजय भामरे, कार्यकारी अभियंता, महावितरण.

..तरच भारनियमनमुक्ती शक्य
श्रीरामपूर नेवासे, राहुरी या तालुक्यांमध्ये या संकल्पनेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील 11 गावांची निवड करण्यात आली. वीजग्राहकांनी थकबाकी भरावी, तरच भारनियमनमुक्ती होईल.
- संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता, श्रीरामपूर विभाग.