आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरात वीजबिलांची होळी; महावितरणच्या भोंगळ कारभाराचा निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अंदाजे रीडिंग घेऊन ग्राहकांना दुप्पट, तिपटीने वीजबिले देणार्‍या महावितरणचा निषेध करून पीपल्स हेल्पलाइनतर्फे मंगळवारी प्रेमदान चौकात वीजबिलांची होळी करण्यात आली.
या महिन्यात वीजवापरापेक्षा जास्तीची बिले आल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. दिवसातून पाच ते सहा तास भारनियमन करण्यात येते. याशिवाय इर्मजन्सीच्या नावाखाली केव्हाही वीज घालवण्यात येते. पीपल्स हेल्पलाइनतर्फे महावितरणचा निषेध करण्यात आला. जास्त बिले आल्याने वीजबिलांची होळी करण्यात आली. यावेळी प्रा. पांडुरंग देवकुळे, प्रदीप जाधव, शाहीर कान्हू सुंबे, अनिल गुजराथी, विजय कानडे, काशिनाथ रायकर, प्रा. सुदाम देवखिळे, दत्तू धोत्रे, हनुमंत काळे, कानिफ शिंदे, भगवान व्यवहारे, अँड. कारभारी गवळी आदी उपस्थित होते. नागरिकांनीही आंदोलनात सहभाग घेतला.
तोटा भरून काढण्यासाठी अवाजवी बिले आकारली
आकडे टाकून वीजचोरी करणार्‍यांकडून हप्ते घेतले जात असल्याने त्यांच्यावर व वीजचोरांवर कारवाई होत नाही. त्यामुळे महावितरण तोट्यात जात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी दुप्पट, तिप्पट बिले दिली जात आहेत. सत्ताधार्‍यांना सर्वसामान्य जनतेचा आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे जनतेच्या गार्‍हाण्यांना केराची टोपली दाखवली जाते. भ्रष्टाचार संपवण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरावे.
-अँड. कारभारी गवळी, अध्यक्ष, पीपल्स हेल्पलाइन.