आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त १६ मंडळांनी घेतला अधिकृत वीजजोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातील केवळ १६ गणेशोत्सव मंडळांनीच अिधकृत वीजजोड घेतला आहे. अनधिकृत वीज जोडामुळे सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, तसेच अपघातही होऊ शकतात. हे टाळण्यासाठी मंडळांनी अधिकृत वीजजाेड घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. त्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गणेश मंडळांसाठी महावितरणने ३.२७ रुपये युनिट इतका वीजदर ठेवला आहे. सिंगल फेजसाठी एक हजार, तर थ्री फेजसाठी तीन हजार रुपये अनामत रक्कम आणि प्रोसेसिंग चार्ज १०० रुपये आकारण्यात येणार आहे. अनामत रक्कम गणेशोत्सवानंतर परत करण्यात येईल. महावितरणच्या आवाहनाला शहरातील केवळ १६ मंडळांनीच प्रतिसाद दिला. जी मंडळे अधिकृत वीजजोड घेणार नाहीत, अशा मंडळांना महावितरणचे दामिनी पथक भेट देईल. अपघात टाळण्यासाठी वीजचोरीच्या परिणामांची जाणीव हे पथक करून देईल अािण गणेश मंडळांना अिधकृत वीजजोड घेण्याचे अावाहन करेल. मात्र, तरीही जी मंडळे अधिकृत वीजजोड घेणार नाहीत, अशा मंडळांचा वीज पुरवठा तातडीने खंडित करून कारवाई करण्यात येईल. दरम्यान, शहरातील गणेश मंडळांकडून या वीजजोडाबाबत चौकशी करण्यात आली, तर काही मंडळांचे अर्ज आले असल्याचे उपकार्यकारी अिभयंता दीपक माने, एल. एम. काकडे यांनी सांगितले.