आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनाच्या विरोधात अमहदनगरात उपोषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- परीक्षांचे सुरू असल्यामुळे मुकुंदनगर भागातील भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी मुकुंदनगर विकास समितीतर्फे मंगळवारी महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

मुकुंदनगर भागात होत असलेली वीजगळती व भारनियमन बंद करण्याचे आश्वासन महावितरणने दिले होते. नागरिकांच्या सहकार्याने प्रभागात नवीन मीटर बसवण्यात आले, परंतु तरी देखील भारनियमन कमी न होता सात तासांचे करण्यात आले. शासकीय निवासस्थाने, कार्यालये, महापालिका व पाणी पुरवठा योजनांकडे कोट्यवधींची थकबाकी असूनही त्याकडे महावितरण दुर्लक्ष करते. मात्र, ऐन परिक्षेच्या काळात वीज बंद ठेवली जाते, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

भारनियमनामुळे मुकुंदनगर प्रभागातील जनतेची गैरसोय होत आहे. परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारनियमन तातडीने बंद करावे, असे समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वीजगळतीवर उपाय करणे व चोरी नियंत्रणात आणण्याची जबाबदारी महावितरणची आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवराज्य पक्ष, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, भारत मुक्ती मोर्चा, मूव्हमेंट फॉर जस्टीस यासह विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा असल्याचे आंदोलकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. अर्शद शेख, अनिस शेख, हारून राजे, फिरोज सय्यद यावेळी उपस्थित होते.