आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘16 मार्चला मनपाची वीज खंडित करू’, महावितरणाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकनेचार उच्च दाबाच्या वाहिन्यांतून केलेल्या वीज पुरवठ्याचे थकीत वीजबिल भरल्यास १६ मार्चला कोणतीही पूर्वसूचना देता वीजपुरवठा खंडीत केला जाईल, असा इशारा अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी यांनी दिला. तसे केल्यास शहरातील पाणी पुरवठा पथदिव्यांची वीज खंडित होणार आहे. महावितरणची मनपाकडे मोठी रक्कम थकित आहे. जानेवारी अखेरपर्यंत हा आकडा १४६ कोटी ८४ लाख ४९ हजार आहे. एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ पर्यंतचे बिल १४ कोटी ३८ लाख हजार आहे. 

एप्रिल ते जानेवारीच्या थकीत बिलापोटी मनपाने फक्त कोटी लाख ६८ हजार २१९ भरले आहेत. चालू आर्थिक वर्षात मनपाने जेमतेम एक कोटी ७८ लाख ४९ हजार हजार भरले आहेत. थकीत रकमेसाठी महावितरणने १३ वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, मनपाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला . महावितरणने या थकबाकीची माहिती पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिली. थकबाकी भरावी यासाठी आवाहन देखील करूनही महापालिकेने काहीच कार्यवाही केली नसल्याचे कोळी यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...