आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Electricity Poll Missing At Mukund Nagar At Ahmednagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुकुंदनगरमधील 25 पथदिवे गेले कोठे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मुकुंदनगर प्रभागात नगरोत्थान विकास कार्यक्रमांतर्गत बसवण्यात आलेले 25 पथदिवे गायब झाले असल्याचा आरोप मुकुंदनगर विकास समितीच्या वतीने करण्यात आला. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी समितीचे उपाध्यक्ष अन्सार सय्यद यांनी केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरोत्थान विकास कार्यक्रमांतर्गत मुकुंदनगर प्रभागात पथदिवे बसवण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे. पथदिव्यांचा वापरही सुरू झाला आहे. परंतु वन विभागाचे कार्यालय ते शाहशरीफ दर्गा या रस्त्यावर अंदाजपत्रकात नमूद केल्यापेक्षा आठ पथदिवे कमी बसवण्यात आले आहेत. फकिरवाडा ते संजोगनगर रस्त्यावर 15 पथदिवे कमी आहेत. अशाप्रकारे दोन्ही रस्त्यांवर मिळून एकूण 25 पथदिवे कमी बसवण्यात आले आहेत.
विजेचे खांबही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित नाहीत. केबल योग्यरित्या टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात शॉर्टसर्किट होऊन मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी या कामाची दखल घेऊन चौकशी करावी, तसेच कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे. अंदाजपत्रकातील अटींप्रमाणे ताबडतोब दुरुस्ती करावी, ; अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.