आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायकलींगचा व्यायाम करता करता विजेची निर्मिती करा..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- व्यायामशाळेत सायकल चालवताना तुम्ही विजेची निर्मितीही करू शकाल..! वीज तयार करणारे हे उपकरण नगरच्या रेणावीकर शाळेत इयत्ता नववीत शिकणार्‍या प्रसाद पोपट धामणे या विद्यार्थ्याने तयार केले आहे.

शहरातील जीममध्ये सायकलींगचा व्यायाम करणारी साधने असतात. ती पाहून व्यायामपटूंच्या स्नायूऊज्रेचा वापर करून वीजनिर्मिती करता येईल, अशी कल्पना प्रसादच्या मनात आली. त्याने शाळेतील विज्ञान शिक्षकांना ती बोलून दाखवली. वर्गशिक्षिका वंदना गोरे, विज्ञान शिक्षिका मनीषा कर्पे, प्रथमेश ढेरे, मुख्याध्यापक गजानन वनारसे आदींनी त्याला प्रोत्साहन देऊन हे उपकरण बनवण्यासाठी मदत केली. निकामी झालेल्या सायकलच्या सुट्या भागांचा वापर प्रसादने केला. सायकलची चेन आणि दातेरी चाकाचा त्याला मोठा उपयोग झाला. पायडल फिरवले की, त्याला जोडलेल्या दुसर्‍या छोट्या चाकावरून गती मिळालेल्या मोठय़ा चक्रावरील पट्टय़ाने डायनोमा कार्यान्वित होतो. सुमारे 150 ते 200 पायडल मारले की, एक व्होल्ट वीज तयार होते. अध्र्या तासाच्या व्यायामात 6 व्होल्टची बॅटरी पूर्ण चार्ज होते, असे निरीक्षण त्याने नोंदवले. चार्ज झालेली बॅटरी नंतर हवी तेथे वापरता येते. व्यायाम करताना कोणतेही वेगळे कष्ट न घेता घरगुती वापरासाठी लागणारी वीज तयार होऊ शकते, हे प्रसादने दाखवून दिले. हे उपकरण शिर्डी येथे भरलेल्या प्रदर्शनात मांडण्यात आले असून परीक्षकांनी त्याचे कौतुक केले आहे.

इन्स्पायर अँवॉर्डमुळे मिळाले प्रोत्साहन
शासनाने सन 2010 पासून सुरू केलेल्या इन्स्पायर अँवार्ड या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांतील संशोधक वृत्ती वाढीस लागली आहे. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी साधने व साहित्यनिर्मितीसाठी पाच हजारांचा निधी विद्यार्थ्यांना दिला जातो. या निधीतून प्रसादने हे साधन तयार केले आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकणार्‍या विद्यार्थ्यांना शासनाकडून 80 हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळते.