आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Project Opens At Dyaneshwar Sugar Factory

'ज्ञानेश्वर'च्या सहवीज प्रकल्पाचे उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे फाटा - ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा १२ मेगावॅटचा ४८ कोटी रुपये खर्चाचा सहवीज प्रकल्प कर्जमुक्त झाल्याने 'ज्ञानेश्वर'ने आता १९.५ मेगावॅटच्या विस्तारीत दुसऱ्या टप्प्यातील सहवीज प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख नरेंद्र घुले कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते करण्यात आला. ९३ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प २०१६-२०१७ हंगामात कार्यान्वित होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३१.५ मेगावॅटचा प्रकल्प ज्ञानेश्वर कारखान्यामध्ये उभा करणार आहे.
१२ मेगावॅटचा प्रकल्प कर्जमुक्त केल्याने "ज्ञानेश्वर'ने या प्रकल्पातून आर्थिकदृष्ट्या सक्षमता सिद्ध केली असल्याने यशाची पहिली पायरी पार केल्यानंतर विस्तारीत पायरीवर आपले पाऊल ठेवले आहे. "ज्ञानेश्वर'च्या विस्तारीत सहवीज प्रकल्प भूमिपूजनप्रसंगी उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, शेवगावचे सभापती संजय फडके, विठ्ठल लंघे, "ज्ञानेश्वर'चे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यस्थापक काकासाहेब शिंदे उपस्थित होते. १२ मेगावॅटच्या प्रकल्पातून निर्माण झालेली आतापर्यंतची वीज महावितरणला विकलेली वीज त्यातून ज्ञानेश्वरच्या सहवीज प्रकल्पाने केलेली प्रगतीची माहिती शेवाळे यांनी दिली.
सभासदांचे सहकार्य
'ज्ञानेश्वर'चा१२ मेगावॅट प्रकल्प कर्जमुक्त होणे हे व्यवस्थापनाच्या कर्तव्यदक्षपणाचे आणि कारखान्यातील अधिकारी कर्मचारी वर्गासोबतच ऊस उत्पादक सभासदांनी केलेल्या सहकार्याचे यश आहे. प्रा.नारायण म्हस्के, संचालक, ज्ञानेश्वर कारखाना.