आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिनेतील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर कारवाई करा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - काही धनदांडग्यांनी सिना नदीच्या पात्रात अतिक्रमणे करून पक्की बांधकामे केली आहेत. त्यामुळे पुराचे पाणी वाहून जाण्याच्या नैसर्गिक मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पुराचे पाणी काठालगतच्या उपनगरांत शिरल्यास मोठे नुकसान होईल. त्यामुळे नदीपात्रात अतिक्रमण करणारे व या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नागरी कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

शहराच्या उत्तरेला असलेल्या वडगाव गुप्ता गावापासून सिन नगरमध्ये प्रवेश करते. नवनागापूर, नागापूर, बोल्हेगाव, सावेडी गावठाण, नालेगाव, बुरूडगाव या उपनगरांतून सिना वाहते. प्रारंभी नदीकाठावरील जमिनी गाळपेरीसाठी घेऊन काहींनी अतिक्रमणे केली. जागेचे भाव गगनाला भिडल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांची नजर नदीपात्राकडे वळाली. नदीपात्रातील सुमारे 800 ते 1000 एकर जमीन बांधकाम व्यावसायिकांनी बळकावली आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

ओढेनाले बुजवून तेथे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे. अतिक्रमणांकडे तलाठी, मंडलाधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. महापालिकेचा अतिक्रमण विभाग तिकडे कधी फिरकत नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी चंगेडे यांनी केली आहे. अतिक्रमणे करणार्‍यांना पाठिशी घातल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

(फोटो - अतिक्रमणांमुळे नगर शहराजवळील सिनापात्र दिवसेंदिवस अरुंद होत आहे.)