आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नाकाबंदी सुरू असताना पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या, तसेच शिवीगाळ धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नगर-पाथर्डी रस्त्यावरील भिंगारनाला येथे सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

पोलिसांकडून सध्या जागोजागी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भिंगारनाला येथे सोमवारी सायंकाळी च्या दरम्यान नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू होती. दुचाकीवरून आलेल्या रवींद्र गायकवाड महेश गायकवाड (सैनिकनगर, भिंगार) या दोघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. तथापि, या दोघांनी दुचाकी थांबवता पोलिस कर्मचारी पी. बी. जगताप यांच्या अंगावर दुचाकी घातली. जगताप यांनी प्रसंगावधान राखून स्वत:चा जीव वाचवला. दोन्ही दुचाकीस्वारांच्या तोंडाला दारूचा वास येत होता. त्यांना लायसन्सची विचारणा केली असता त्यांनी पोलिस कर्मचारी संदीप गायकवाड यांना धक्काबुक्की केली. जगताप यांनाही शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणला.