आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिक्षेकऱ्यांना जेवण देऊन वाढदिवस केला साजरा, अभियंते अक्षय बल्‍लाळ यांचा अनोखा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नगर- आजही अनेक कुटुंबे अशी आहेत ज्यांना एक दिवसाचे जेवण नीट मिळत नाही. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करावा, जेणेकरून याचा गरीब गरजू लोकांना फायदा होईल. भुके को अन्न, प्यासे को पाणी याप्रमाणे इंजिनिअर अक्षय बल्लाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भिक्षेकऱ्यांना एकवेळचे जेवण देण्यात आले. 
 
यावेळी श्रीकांत नुती, शुभम सुंकी, अमोल गुंडू, अमित गाली, प्रवीण सुंकी, रोहित गुंडू, अक्षय यन्नम, संतोष गुंडू, संजय नुती, योगेश न्यालपेल्ली, श्रीनिवास बुरगुल आदी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त केक कापण्यात येतो, पण बल्लाळ मित्रपरिवाराने या गोष्टींना फाटा दिला. शहरातील प्रत्येक मंदिराजवळ बसलेल्या भिक्षेकऱ्यांना शोधून त्यांना भोजन देण्यात आले. सुमारे ६० ते ७० भिक्षुकांना पुलाव बिस्किटांचा पुडा देण्यात आला. 
 
यावेळी बल्लाळ म्हणाले, असा उपक्रम प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त राबवला पाहिजे. आज तरुण पिढी वाढदिवस फ्लेक्स बोर्ड, पार्टी अशा पद्धतीने साजरा करते. आपण माझ्या मित्रांनी जो वाढदिवस साजरा केला, त्याने समजात चांगला संदेश जाईल. उपस्थित सर्व मित्रांचे श्रीकांत नुती यांनी आभार मानले. 
बातम्या आणखी आहेत...