आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्किल डेव्हलपमेंट सेंटर ठरणार मैलाचा दगड...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेंटरमधील प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारी अद्ययावत मशिनरी. छाया : कल्पक हतवळणे)
नगर - शैक्षणिक आघाडीवर अयशस्वी ठरलेला तरुण पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे, बेरोजगार तरुणांना रोजगाराभिमुख करणे सध्या कार्यरत असणा-यांच्या ज्ञानात भर घालणे या उद्देशाने नगरच्या एमआयडीसीत इंजिनिअरिंग क्लस्टर स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभे राहिले आहे. राज्यात अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र आहे. या केंद्रामुळे उद्योगजगत शिक्षण संस्था यांच्यातील अंतर कमी होणार आहे. दरवर्षी किमान दोन हजार लोकांना कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर हे सेंटर चालवले जाणार आहे.

जिल्ह्यात अनेक सरकारी खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. मात्र, तेथे जे शिक्षण मिळते त्याचा थेट प्रात्यक्षिकांशी खूप कमी संबंध येतो. कारण शैक्षणिक संस्थांना यंत्रसामग्रीची मर्यादा पडते. त्यामुळे शिक्षण झालेले मनुष्यबळ मोठे असतानाही औद्योगिक क्षेत्राला त्याचा फारसा उपयोग होत नाही. शिक्षण होऊनही बेरोजगार असलेल्या तरुणांपुढे काय करायचे, हा प्रश्न वासून उभा असतो. या सर्व परिस्थितीचा विचार करून एमआयडीसीतील काही उद्योजकांनीच या तरुणांचे रूपांतर थेट कुशल अद्ययावत अशा प्रशिक्षित कर्मचात रूपांतर करण्यासाठी ‘कौशल्यांचा विकास करणारे केंद्र’ स्थापन करण्याचे ठरवले. त्यासाठी सन २००७ मध्ये एका तज्ज्ञाच्या व्याख्यानाने त्यांना या केंद्रासाठी प्रेरणा मिळाली. उद्योजक अजित घैसास अविनाश बोपर्डीकर यांनी सर्वप्रथम अशी कल्पना मांडली. त्यानंतर के. एम. भिंगारे, अभय दफ्तरदार, घैसास बोपर्डीकर यांच्यात २००७ ते २००९ दरम्यान प्रत्येक आठवड्याला बैठका होऊन हा प्रकल्प आकारास आला.

त्यानंतर सन २०१० मध्ये पब्लिक लिमिटेड कंपनीची नोंदणी करण्यात आली. राजीव गोरे, मिलिंद कुलकर्णी, शशांक कुलकर्णी, दौलत शिंदे, चिन्मय सुखटणकर, गोविंद दुसाद हे उद्योजकही या प्रकल्पात सहभागी झाले. प्रकल्पासाठी भागधारकांकडून ४६.९८ लाखांचा निधी उभारून एमआयडीसीत दोन एकर जमीन खरेदी करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष अनेक आर्थिक अडचणींवर मात करत २०१४ मध्ये या प्रकल्पासाठी बांधकाम सुरू झाले. दरम्यान, अहमदनगर ऑटो अँड इंजिनिअरिंग असोसिएशन (एएईए) क्रॉम्प्टन ग्रीव्हज यांच्यात एक करार करण्यात आला. क्रॉम्प्टन कंपनीनेही ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ अंतर्गत या सेंटरला भरीव निधी दिला आहे. हे सेंटर म्हणजे संयुक्त प्रकल्प आहे. विशेष म्हणजे अशा क्लस्टरची माहिती घेण्यासाठी ‘एएइए’च्या १४ सदस्यांनी जर्मनीचा दौरा केला आहे. या सेंटरमुळे शहरातील उद्योजकांसह तरुणांना देखील मोठा फायदा होणार आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर हे सेंटर चालणार असल्याने सर्वसामान्य तरुणांना अल्प खर्चात अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षण घेता येणार आहे. तरुणांनी या सेंटरचे स्वागत केले असून उद्योजकही समाधानी आहेत.

सेंटरचे फायदे
याआधी आयटीआय विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांत शिकलेल्या तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत होते. आता त्यांना या सेंटरमुळे नगरमध्येच स्थिरावण्यास मदत होणार आहे. तसेच येथील उद्योगांनाही लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळही या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच अभ्यासक्रम सुरू केले जाणार


सोमवारी उद्घाटन
याकेंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल कवडे क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचे ग्लोबल हेड संजय सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी नगरच्या आयएमएस संस्थेचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, क्रॉम्प्टन कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक विनायक दळवी, सेंटरचे अध्यक्ष के. एम. भिंगारे यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.

१६ कोटींचा खर्च
क्लस्टरच्याअद्ययावत इमारतीत हे सेंटर सुरू होणार आहे. उद्योगांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवण्याच्या उद्देशाने हे सेंटर सुरू होणार आहे. या केंद्राची उभारणी करण्यासाठी १६ कोटींचा खर्च झाला. १२ कोटी रुपये यंत्रसामग्रीच्या रूपाने सरकारने दिले आहेत. प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपनीचे संचालक, तर १३० भागधारक आहेत.

तज्ज्ञ बनवणार अभ्यासक्रम
रोजगाराभिमुख तरुण घडवण्याचे उद्योग क्षेत्राला उपयुक्त ठरणारे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट प्रमुख असल्याने येथील अभ्यासक्रमही तसेच तज्ज्ञांनी तयार केलेले असतील. या अभ्यासक्रमांसाठी अतिशय कमी (पुणे-मुंबईच्या तुलनेत ५० टक्के) प्रशिक्षण मूल्य ठेवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांना ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेंट’ची संलग्नता घेण्यात येणार आहे.

नगरचे सेंटर एकमेव
नगर चेस्किल डेव्हलपमेंट सेंटर राज्यात एकमेव ठरणार आहे. कारण काही ठिकाणी असे सेंटर असले, तरी ते एकाच उद्योगाशी संबंधित आहेत. नगरचे सेंटर मात्र सर्वच उद्योगांना उपयुक्त ठरणा कौशल्याचे प्रशिक्षण देणारे असणार आहे. या केंद्रामुळे तरुणांना विशेष प्रशिक्षणासाठी नाशिक किंवा पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही.

-एकूण ४० हजार चौरस फुटांची इमारत
- सहा सुसज्ज वातानुकूलित क्लासरूम
- एकाच वेळी २०० प्रशिक्षणार्थींची सोय
- टूल रूम (विविध प्रकारच्या मशीन)
- दोन टेस्टिंग लॅबोरेटरीज
- पाचशे जण बसू शकतील असे ऑडिटोरियम
- अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षक
बातम्या आणखी आहेत...