आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: खड्ड्याने घेतला इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा जीव, कॉलेजात जाताना अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच ठिकाणी झाला अपघात. - Divya Marathi
याच ठिकाणी झाला अपघात.
नगर- जामखेड नाक्याजवळ खड्डे चुकविताना गॅसच्या टेंपोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका कॉलेज तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश रघुनाथ उगले (वय- 20 रा. जेऊर हैबती, ता. नेवासा) असे मृत तरूणाचे नाव आहे. ऋषिकेश विश्वभारती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तो नेवासेकडून येत होता. जामखेड नाक्याजवळ आला खड्डे चुकवायला गेल्यानंतर मागून येणा-या टेंम्पोने त्याला जोरदार धडक दिली. ऋषिकेश कॉलेजला जात असताना अपघात झाला. अपघातानंतर एकच गर्दी जमली.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, घटनास्थळावरील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...