आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वभारती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने बनवली "इको फ्रेंडली वीट'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करणारा विद्यार्थी वर्धमान लुणावत याने विघटन होणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून घराच्या बांधकामासाठी इको फ्रेंडली वीट तयार केली आहे. भूकंप आगीपासून ही वीट संरक्षण करू शकेल. विशेष म्हणजे बांधकामासाठी सध्या वापरण्यात येणाऱ्या लाल विटेपेक्षा या इको फ्रेंडली विटेचा खर्च २० ते ४० टक्क्यांनी कमी आहे. लवकरच आपल्याला या विटेचे पेटंट मिळेल, असा विश्वास वर्धमानला आहे.

आनंदऋषी हॉस्पिटलजवळील माणिकनगरमध्ये राहणारा वर्धमान गेल्या चार महिन्यांपासून इको फ्रेंडली वीट तयार करण्याबाबत संशोधन करत आहे. त्याच्या या संशोधनात वडील मनोज लुनावत यांच्यासह विश्वभारती महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरित झालेल्या वर्धमानला प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याची कल्पना सूचली. त्यातून त्याने टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून इको फ्रेंडली वीट तयार करण्याचा संकल्प केला. चार महिने संशोधन करून त्याने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. बांधकामासाठी सध्या वापरली जाणारी साधी लाल वीट भूकंप आगीपासून घराचे संरक्षण करू शकत नाही.
वर्धमानची इको फ्रेंडली वीट मात्र या दोन्ही नैसर्गिक आपत्तीपासून घराचे संरक्षण करू शकेल. विशेष म्हणजे साध्या लाल विटेच्या तुलनेत ही इको फ्रेंडली वीट चारपट अधिक भार सहन करू शकते. लाल विटेपेक्षा या विटेचा निर्मिती खर्च २० ते ४० टक्के कमी आहे. वर्धमानने इको फ्रेंडली विटेच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्या आहेत. नाशिक येथील शासकीय प्रयोगशाळेत त्याने ही वीट चाचणीसाठी पाठवली आहे. या इको फ्रेंडली विटेचे पेटंट अॅप्लिकेशनही त्याने फाइल केले आहे. लवकरच हे पेटंट आपल्या नावावर होईल, असा विश्वास वर्धमानने दैनिक दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केला.
इको फ्रेंडली विटेसह वर्धमान.

विटेचे फायदे
- एकाइको फ्रेंडली विटेच्या वजनाच्या टक्के प्लास्टिक
- ५००० हजार विटांत ५०० किलो प्लास्टिक
- साध्या लाल विटेपेक्षा २० ते ४० टक्के कमी खर्च
- वीट तयार करण्यासाठी प्रशिक्षित कामगारांची गरज नाही
- विटेवर कोणत्याही ऋतूचा परिणाम होत नाही
- स्टीलची जाळी असल्याने भूकंपरोधक जास्त ताकद
- पाण्याची ७० टक्के बचत

सर्व खर्च कॉलेज करणार
^वर्धमाननेकेलेल्यासंशोधनासाठी महाविद्यालयाने संपूर्ण सहकार्य केले. विटेच्या आतापर्यंतच्या सर्व चाचण्या महाविद्यालयातच करण्यात आल्या. यापुढे या संशोधनात जी मदत खर्च लागेल, ती सर्व महाविद्यालय करणार आहे.'' डॉ. ए. के. कुरेशी, प्राचार्य,विश्वभारती अभियांत्रिकी.
लवकरच पेटंट नावावर होईल

संशोधनातवडिलांचेमित्र अजित क्षीरसागर, प्राचार्य डॉ. ए. के. कुरेशी, प्रा. के. एस. शेख, प्राचार्य प्रवीण कोकाटे, शोएब सय्यद आदींनी मदत केली. पेटंट फाईल केले आहे. लवकरच हे पेटंट माझ्या नावावर होईल.'' वर्धमान लुणावत, विद्यार्थी,विश्वभारती अभियांत्रिकी.