आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entrepreneurship Development Plan,latest News In Divya Marathi

उद्योजकता विकास योजना सर्वत्र रुजावी : शरद कोलते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राष्ट्रीय सेवा योजना प्रथम नगरमध्ये सुरू झाली. या चळवळीप्रमाणे उद्योजकता विकास योजनाही नगरमध्ये रुजावी, अशी अपेक्षा "आयएमएस'चे सरसंचालक डॉ. शरद कोलते यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात उद्योजकता विकास चळवळ वाढावी, यासाठी डॉ. कोलते यांच्या पुढाकाराने शहर व परिसरातील शिक्षण संस्थाचालक व प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे, जी. डी. खानदेशे, डॉ. भास्कर झावरे, हिंद सेवा मंडळाचे मधुसूदन मुळे, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे शरद रच्चा, हनुमान विद्या प्रसारक मंडळाचे बन्सी म्हस्के, रामकृष्ण फाउंडेशनचे बाळासाहेब गांधी, उद्योजक श्रीगोपाल धूत, के. जी. मुनोत कॉलेजचे किशोर मुनोत या वेळी उपस्थित होते. उद्योजकता विकास तज्ज्ञ विनोद पारटकर या वेळी म्हणाले, आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्यात उद्योजक होण्याची धमक आहे. त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळण्याची गरज आहे. त्याकरिता प्रत्येक शाळा, कॉलेज, आयटी संस्थेमध्ये उद्योजकता विकासाचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षित प्राध्यापक हवेत. विद्यार्थी घडवण्याच्या उपक्रमाची चळवळ उभारण्यासाठीच्या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. संचालक डॉ. एम. बी. मेहता यांनी स्वागत केले. प्रा. रािधका मुळे यांनी आभार मानले.

कौशल्यावर आधारित शिक्षण
देशात कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज आहे. नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होण्यासाठी युवकांना प्रेरणा मिळाली पाहिजे. देशाच्या विकासात 45 टक्के लघुद्योजकांचे योगदान आहे. उत्पादन, निर्यात व रोजगार निर्मितीत लघु उद्योगच अग्रेसर आहेत. शहरातील सर्व महाविद्यालये, व्यवस्थापन संस्था यांनी पुढाकार घेऊन उद्योजकतेची चळवळ उभारण्याची गरज आहे, असे डॉ. कोलते म्हणाले.