आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळढोक अभयारण्याची अंतिम अधिसूचना तातडीने काढा, बबनराव पाचपुते यांची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर/ श्रीगोंदे- नगर व सोलापूर जिल्ह्यात पसरलेल्या माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र कमी करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. यावर तातडीने कार्यवाही करून अंतिम अधिसूचना काढण्याची मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. अंतिम अधिसूचना काढण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
माळढोक पक्षी अभयारण्यासाठी नगर व साेलापूर जिल्ह्यातील खासगी क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. माळढोक पक्षांचा वावर या ठिकाणी आढळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मागणीवरून खासगी क्षेत्र वगळण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू झाली. गेल्या अनेक दिवसांपासून ही प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरविकास विभागाकडूनही संबंधित जागेवर विकासाच्या परवानग्या नाकारल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. राज्यातील तत्कालीन व आताच्या सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही हा विषय पुढे सरकायला तयार नाही. अभयारण्याच्या मर्यादेमुळे सुविधा असूनही शेतकऱ्यांना त्यांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून अंतिम अधिसूचना काढण्याचे आदेश निर्गमित करण्याची मागणी पाचपुते यांनी केली आहे.
माळढोक माहीत नसणारांनी गप्प बसावे-
माळढोक अभयारण्याचा प्रश्न पाचपुते यांनी मार्गी लावण्यासाठी कित्येक महिने मुंबई व दिल्लीच्या येरझऱ्या घातल्या. ज्यांनी माळढोक कधी पहिला नाही, या प्रश्नाशी संबंध नाही, अशी मंडळी माळढोक अभयारण्याबद्दल जनतेत संभ्रम पसरवत आहे. त्यांनी गप्प बसणे हिताचे ठरेल.'' बाळासाहेब महाडिक, तालुकाध्यक्ष भाजप, श्रीगोंदे.