आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशामध्ये सर्वांना सारखाच अधिकार हीच खरी सहिष्णुता - विधानसभेचे सभापती बागडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: महाचिंतनी कार्यक्रमात बाोलताना विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे.
नेवासे - भारतात सर्व धर्म पंथाला स्वातंत्र्य आहे. कोणीही एकमेकांवर कुरघोडी करत नाही. ज्याला पटते तो त्या पंथाची उपासना करतो. देशात सर्वांना सारखा अधिकार हीच खरी सहिष्णुता आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी केले.

नेवासेफाट्यावर सुरू असलेल्या महाचिंतनी शिबिरात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बाभुळगावकर शास्त्री, माजी आमदार पांडुरंग अभंग, आमदार बाळासाहेब मुरकुटे, कडूभाऊ काळे, डाॅ. शिवाजी शिंदे, राज्य साहित्यिक सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, रंजना बेल्हेकर आदी उपस्थित होते. बागडे म्हणाले, समाजाचे दोष करून त्यावर प्रकाश टाकण्याचे काम महानुभाव पंथाकडून होते. समाजातील वैगुण्य दूर झालेच पाहिजे. बाभुळगावकर शास्त्रींनी समाज प्रबोधनासाठी नामवंत प्रवचन कीर्तनकार यांना एकत्र करून समाजातील दोष दूर करण्याचा प्रयत्न चालवला. वातावरणात बदल झाल्याने साऱ्या जगाला पर्यावरणाची चिंता लागली. पूर्वी नियमित पाऊस पडायचा. आता पावसाची झड लागत नाही. आता पाणी टंचाई असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांनी विहिरीचे पुनर्भरण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. प्रवचनाचा व्यवहारात उपयोग करा, आयुष्यात लाभ होईल. समाज अंतर्मुख होऊन त्यात परिवर्तन झाले पाहिजे. नेवाशातील चक्रधर स्वामींच्या मंदिरासाठी जागा पुरातत्व खात्याकडून मिळवून देऊ. त्याचा प्रस्ताव तयार करा, सर्व संबंधितांची एकत्र बैठक बोलावून तोडगा काढू, असे अाश्वासन त्यांनी दिले. चक्रधर स्वामींचे वास्तव नेवासे शहरात दिवाळी सणाच्या कालावधीत महिने होते. ती जागा लाडमोड टेकडी होय. सध्या ही जागा पुरात्तव विभागाचे अखत्यारित आहे. ती मिळवून देण्याची मागणी अभंग यांनी बागडे यांच्याकडे केली.
'तो' मला मिळालेला सर्वात माेठा पुरस्कार
शेतकरी जीवनाची व्यथा मांडणारी माझीच कविता अादिवासी तांड्यावरील मुलांच्या ताेंडून मलाच एेकायला मिळते. हाच मला मिळालेला सर्वात माेठा पुरस्कार अाहे. शेतकऱ्यांच्या अात्महत्येवर ८० कविता टाहाे हा कवितासंग्रह केलेला आहे. इंद्रजीत भालेराव, कवी.
बातम्या आणखी आहेत...