आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या स्थापनेला येथून झाला प्रारंभ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिंगारजवळ झालेली लढाई 28 मे 1490 रोजी जिंकल्यानंतर या विजयाप्रीत्यर्थ मलिक अहमदने ‘कोट बाग निझाम’ नावाचा महाल बांधला. तीच नगरच्या स्थापनेची मुहूर्तमेढ ठरली. पुढे या महालाभोवती तटबंदी आणि खंदक तयार करण्यात येऊन त्याचे रूपांतर किल्ल्यात करण्यात आले. अहमद निझामशहाचा नातू हुसेनशहाने काळाची गरज ओळखून या मातीच्या तटबंदीच्या जागी मजबूत चिरेबंदी कोट उभा केला. हा किल्ला लवकरच 525 वर्षांचा होईल. ज्या वास्तूपासून राजधानी वसायला सुरुवात झाली, त्या ‘कोट बाग निझाम’ची अवस्था आता दयनीय झाली आहे. ब्रिटिशांच्या काळात काही बदल करून ही वास्तू वापरली जात होती.
वरचा मजला नामशेष झाला असला, तरी ही वास्तू अजून उभी आहे. यातील पहिले चित्र व छायाचित्र सुमारे दीड शतकापूर्वीचे, तर तिसरे छायाचित्र आताचे आहे. नगरचा 524 वा स्थापना दिवस येत्या बुधवारी साजरा होत आहे. निदान यानिमित्ताने या वास्तूचे दुर्दैवाचे दशावतार दूर होतील का ? (छायाचित्र सौजन्य - ब्रिटिश लायब्ररी, लंडन)