आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरेस्टवीर अरुणिमाचे नगरमध्ये उत्साहात स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एव्हरेस्टवीर अरुणिमा सिन्हा यांचे सोमवारी सायंकाळी नगरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. एमआयडीसीतील स्नेहालयच्या पुनर्वसन प्रकल्पात मंगळवारी (१८ नोव्हेंबर) होणाऱ्या राज्यस्तरीय युवा प्रेरणा शिबिरासाठी त्या आल्या आहेत.

सकाळी १० वाजता या शिबिराला प्रारंभ होईल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, डॉ. शशी धर्माधिकारी (फ्रान्स), सुवालाल शिंगवी, अलका मेहता-सांकला, कॅप्टन विठ्ठलराव सोसे, पुण्यातील कमिन्स महाविद्यालयाच्या प्राचार्य स्वाती सायनकर, डॉ. आनंद पाटील आदी यावेळी उपस्थित असतील.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नुपूर व डॉ. संग्राम पाटील यांची प्रकट मुलाखत सकाळी पावणेबारा वाजता होणार आहे. ही मुलाखत शेवगाव येथील उमेश घेवरीकर घेतील.

"आयटी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी' या विषयावर विप्रो कंपनीचे ग्लोबल रिक्रूटमेंट हेड राजीवकुमार सिंग, तर "आदर्श जीवनशैली' या विषयावर अलका मेहता शिबिरार्थींशी संवाद साधतील. स्नेहालयाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती उपस्थितांना देण्यात येईल. या शिबिरात राज्याच्या विविध भागातील युवक-युवती सहभागी होणार आहेत.

राष्ट्रध्वज प्रदान सोहळा आज
ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च कोईझस्को शिखर सर करण्यासाठी जाणारी पहिली अपंग महिला एव्हरेस्टवीर अरूणिमा सिन्हा यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.