आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेतर्फे इच्छुकांची 10ला लेखी परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची रविवारी (10 नोव्हेंबर) दादा चौधरी विद्यालयात लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. मनसेची अभ्यासू उमेदवारांसाठीही चाचपणी सुरू आहे, अशी माहिती निवडणूक प्रमुख वसंत लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लेखी परीक्षेत शहर व महापालिकेसंदर्भात प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षा 100 गुणांची राहील. त्याशिवाय मुलाखत, उमेदवाराचा जनसंपर्क यालाही काही गुण राखीव ठेवण्यात आलेले आहेत. परीक्षेचे नियंत्रण पुण्यातील मनसेचे पक्षनिरीक्षक असलेले पदाधिकारी करतील, असे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी सांगितले. इच्छुक उमेदवारांना आधी परीक्षेचा अर्ज व माहितीपुस्तिका दिली जाणार आहे. याची किंमत दोन हजार रुपये आहे.

उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र दिले जाईल, असे शहर निरीक्षक संजय झिंजे यांनी सांगितले. इच्छुक उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर कार्यकर्त्यांना आणू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनसे उमेदवारीसाठी शक्तिप्रदर्शनाला थारा नसून उमेदवारांच्या बुद्धिप्रदर्शनावर भर दिला जाणार आहे. लेखी परीक्षेनंतर मुलाखती होणार आहेत.

यावेळी शहरप्रमुख सतीश मैड, कैलास गिरवले, महिलाध्यक्षा अनिता दिघे, नगरसेवक किशोर डागवाले, गणेश भोसले, मनविसे जिल्हाध्यक्ष वैभव सुरवसे, शहरप्रमुख सुमित वर्मा यांच्यासह केतन नवले, रमेश सानप, माया बाबर, विनोद काकडे, मनोज राऊत, नितीन भुतारे, गणेश शिंदे, चंद्रकांत ढवळे, अभिनय गायकवाड आदी मनसेच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.