आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam Result Issue At Pune University, Divya Marathi

पुणे विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ऑक्टोबर 2013 मध्ये झालेल्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल तब्बल तीन महिने उशिरा लागला. त्यानंतर गुणपडताळणीसाठी मागवलेल्या फोटोकॉपीही तब्बल तीन महिने उशिरा मिळाल्या. आता पुढच्या आठवड्यात विधी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सुरु होत आहे. तरीही अजून गुणपडताळणी झालेली नाही. याला पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची दिरंगाई कारणीभूत आहे. विद्यापीठाच्या या सावळ्या गोंधळामुळे न्यू लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

पुणे विद्यापीठाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात न्यू लॉ कॉलेजमध्ये विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचा निकाल लागण्यासाठी विद्यार्थ्यांना डिसेंबर-जानेवारी महिन्याची वाट पहावी लागली. निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी करण्यासाठी अर्ज केला. परंतु गुणपडताळणी करायची असेल, तर विद्यार्थ्यांनी आधी पेपरची फोटोकॉपी मागवणे विद्यापीठाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शंका असलेल्या पेपरची फोटोकॉपी मागवली. विद्यार्थ्यांनी मागवलेल्या पेपरच्या फोटोकॉपीज तब्बल तीन महिन्यांनी महाविद्यालयाला मिळाल्या. या फोटोकॉपी पाहून ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे, त्यांनी 12 एप्रिलपर्यंत गुणपडताळणीचे अर्ज भरुन महाविद्यालयात द्यावेत, अशी सूचना महाविद्यालयाच्या सूचनाफलकावर लावण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे 20 एप्रिलपासून विधी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सुरु होत आहेत. आता हे गुणपडताळणीचे अर्ज भरल्यानंतर आपला निकाल केव्हा मिळणार, याची चिंता विद्यार्थ्यांना पडली आहे.

‘फोटोकॉपी’ही मिळेनात
पेपरची फोटोकॉपी मागवणे विद्यापीठाने बंधनकारक केले. या फोटोकॉपीज तीन महिने उशिरा मिळाल्या. काही विद्यार्थ्यांना तर फोटोकॉपीज अजूनही मिळालेल्या नाहीत. गुणपडताळणी अर्ज भरण्याची 12 एप्रिल ही अंतिम मुदत आहे. आता आपल्याला फोटोकॉपीज मिळणार कधी अन् आपण गुणपडताळणी अर्ज भरणार कधी, त्यामुळे आपल्या निकालाचे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.


परीक्षा विभागच कारणीभूत
या विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी अर्ज करीत बसायचा की, अंतिम सत्र परीक्षेची तयारी करायची? परीक्षा विभागाचा गलथानपणामुळेच विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत आम्ही विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंना जाब विचारणार आहोत.’’ प्रदीप ढाकणे, अध्यक्ष, युगंधर युवा प्रतिष्ठान