आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक व्यायामामुळे मणके विकार बरे होतात- डॉ.कोठारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पूर्वी पाठदुखी आणि मणके विकारांवर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता आधुनिक व्यायाम पद्धती व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले, तर शस्त्रक्रिया न करता पाठदुखी, मणके विकार बरे होतात, असे प्रतिपादन पुण्याच्या संचेती हॉस्पिटलचे स्पाइन सर्जन डॉ. अजय कोठारी यांनी केले.

येथील पी. एम. मुनोत मेमोरियल ट्रस्टतर्फे केशरगुलाब मंगल कार्यालयात आयोजित ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ या उपक्रमात ‘पाठ फिरवा पाठ दुखीवर’ या विषयावर डॉ. कोठारी बोलत होते. या उपक्रमाचा प्रारंभ र्शावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी सी. ए. रमेश फिरोदिया, गुलाबबाई मुनोत, शहा फाउंडेशनचे चेतन गांधी, शरद मुनोत, रमणजी मेहेर आदी उपस्थित होते. डॉ. कोठारी म्हणाले, संगणकाच्या अति वापरामुळे सध्या पाठदुखीचे प्रमाण वाढले आहे. शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण नवीन पिढीत फास्टफूडमुळे कमी होत आहे. पाठदुखीवर आधुनिक योगा, ध्यानधारणा, फिजिओथेरपी व व्यायाम या सर्वांचा संबंधित व्यक्तीच्या आजाराचे प्रमाण व गरजेनुसार वापर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली झाला पाहिजे. पाठुदखीसाठी आता वॉकिंग स्वीमिंग टँक ही नवी कल्पना परदेशात व देशात वाढत आहे. छातीपर्यंतच्या पाण्यात चालण्याचे फायदे दिसून येत आहेत. प्रास्ताविक मुनोत ट्रस्टचे शरद मुनोत यांनी केले. आभार रमण मेहेर यांनी मानले.
बसण्याच्या व झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेच पाठदुखीचा त्रास

बसण्याची, काम करण्याची, झोपण्याची चुकीची पद्धत ही पाठदुखीची कारणे आहेत. झोपताना मानेला आधार देणारी उशी व गुडघ्याखाली उशी घेतली, तर पाठ, पाय, गुडघेदुखी कमी होईल. झोपण्यासाठी कापसाची गादी सवरेत्तम, तर जास्त पाठदुखीचा त्रास असणार्‍यांना लाकडी फळी व त्यावर सतरंजी योग्य आहे, असे डॉ. कोठारी यांनी सांगितले.