आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exhibition Management Rivhilesana Successful In Ahmednagar

प्रदर्शनाच्या माध्यमातून तरुणाईने गिरवले व्यवस्थापनाचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पाठ्यपुस्तकात शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात करण्याची वेळ आली की बऱ्याचदा फजिती होते. असे होऊ नये म्हणून व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष धडे गिरवण्याची संधी नगर महाविद्यालयातील व्यवस्थापन शाखेने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. या विद्यार्थ्यांनी शनिवारी कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या मॅनेजमेंट रिव्हिलेशन एक्झिबिशनला तरूणाईकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
या प्रदर्शनात खाऊच्या स्टॉलपासून लाकडापासून तयार केलेल्या कलाकृतीपर्यंत विविध ३१ स्टॉल होते. त्यात जीन्स, टॉप, शूज, ग्रिटिंग्ज, पुस्तके, आयटी, ऑटोमोबाइल, काष्ठशिल्प अशी अनेक दालने होती. महाविद्यालयीन युवक-युवतींबरोबर प्राध्यापक, तसेच शहरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. टॅटूचाही स्टॉल प्रदर्शनात होता. येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन करण्यात येत होते. या प्रदर्शनाचे उद््घाटन प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते झाले. यावेळी विभागप्रमुख डॉ. दिनेश मोरे व अन्य प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. लेवीस, नायके यांनी हे प्रायोजक प्रदर्शनासाठी लाभले. प्रदर्शनाच्या मध्यभागी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर अँडिज डान्स अकादमी, व्हीक्टर, रिदम, देवाज््, डनी आणि द इडियटस्् या ग्रूपच्या वतीने स्टेज शो सादर करण्यात आले. ते पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पाश्चिमात्य, तसेच हिंदी चित्रपटांतील गाण्यांच्या तालावर तरूणाई थिरकत होती. विशेष म्हणजे यात युवतींची संख्या लक्षणीय होती.
प्रदर्शनाचे आयोजन कसे करावे, त्यासाठी पूर्वतयारी कशी करावी, कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, विक्री वाढवण्यासाठी कशाची मदत होऊ शकते अशा अनेक गोष्टी तरुणाईला या प्रदर्शनातून शिकता आल्या.
लाकडी खेळण्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
या प्रदर्शनात शहा वूड हँडिक्राफ्टचे (गंजबाजार) दालन होते. त्यात लाकडापासून तयार केलेल्या कंगव्यापासून ते बैलगाडीपर्यंत विविध प्रकारच्या वस्तू व आकर्षक खेळणी होती. मणिखांब, गौरीहार, गणपती, श्रीकृष्णाचा पाळणा, होमहवनासाठी लागणारी पळी, चौरंग याबरोबरच लाकडी बुद्धिबळ, रेल्वे इंजिन अशा अनेक गोष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. तेली समाजाच्या लग्नसमारंभात भेट दिला जाणारा छोटेखानी तेलाचा घाणा इतका हुबेहूब होता की पाहणारी प्रत्येक व्यक्ती विस्मयचकीत होत असे.