आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसाठी पाणी ठेवूनच जायकवाडीबाबत निर्णय, पालकमंत्री राम शिंदे यांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय जलसंपदा विभाग घेईल. मात्र, नगर जिल्ह्यासाठी पुरेसे पाणी ठेवूनच जायकवाडीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे नगरचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातील धरणांमधील पाणी आरक्षणाबाबतच्या बैठकीनंतर मंत्री शिंदे पत्रकारांशी बोलत होते. सन २०१५-१६ साठी नगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. वाढीव ६५ लाख २९ हजार लोकसंख्येचा विचार करुन हे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यातील विविध धरणांमधील हजार ३८१.६०३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी हजार ७९६.३६१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. यंदा ५८५.२९२ दशलक्ष घनफूट जास्त पाणी आरक्षित ठेवण्यात आले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९.१७ टक्के वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, ३५ लघू प्रकल्प कोल्हापूर पध्दतीचे बंधारे यात हे पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे.
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत विचारले असता, शिंदे म्हणाले, पाणी सोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय राज्याचा जलसंपदा विभाग घेईल. नगर जिल्ह्याला पुरेसे पाणी ठेवून याबाबत निर्णय घेतला जाईल.