आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीमधील अंबिका इस्पातमध्ये स्फोट, सहा कामगार जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - एमआयडीसीतील अंबिका इस्पात या स्टील उत्पादक कंपनीच्या भट्टीत झालेल्या स्फोटात सहा कामगार जखमी झाले. मंगळवारी (23 जुलै) रात्री आठ वाजता ही दुर्घटना घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेला 24 तास उलटल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे यांची ही कंपनी आहे.

जितेंद्र कन्हैयासिंग यादव (35, सोहदा, जि. सेहताज, बिहार), र्शीकिसन रामजीवन निसार (21, मदनीपूर, उत्तरप्रदेश), मिरकलेश सुरय्या यादव (38), भय्यनाथ प्रकाश रॉय (38), देवेंद्र नथुनी रॉय (45) व महेंद्र बिलकन यादव (34, सर्व राहणार मिसोरनिया, जि. सीतामय, बिहार) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. हे कामगार कंपनीच्या परिसरातच रहात होते.

मंगळवारी रात्री लोखंडी भट्टीचा स्फोट होऊन भट्टीजवळ काम करणारे सहा कामगार त्यात भाजले. सहायक फौजदार त्रिंबक कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र रंगलालजी व्यास (अंबाला, जि. चिलीया, राजस्थान) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी भट्टीजवळ काम करताना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी त्याने व्यवस्थित पार पाडली नाही, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर कंपनी बंद केली आहे. स्वयंचलित यंत्रणा असलेली नवीन फॅक्टरी सुरु करणार आहोत, असे उद्योजक नागरगोजे यांनी सांगितले.


तर संचालकांविरुद्ध गुन्हा
औद्योगिक सुरक्षाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालात ठपका ठेवल्यास कंपनीच्या संचालकांचा आरोपींमध्ये समावेश केला जाईल.’’ चंद्रशेखर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक.