आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे नगरसेवकांची अखेर हकालपट्टी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार नगरसेवकांची पक्षाने हकालपट्टी केली. महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश पाळल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस शिरीष सावंत यांनी ही कारवाई केली. दरम्यान, मनसेचे चारही नगरसेवक राष्ट्रवादी नेत्याच्या दावणीला बांधले गेल्यामुळेच त्यांनी पक्षादेश पाळला नसल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
महापौरपदाच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या मनसेच्या चारही नगरसेवकांना त्यांच्या पक्षाने घरचा रस्ता दाखवला. या निवडणुकीत युतीचे उमेदवार सचिन जाधव यांना मतदान करावे, असे लेखी आदेश मनसेचे प्रदेश सरचिटणीस सावंत यांनी गटनेते गणेश भोसले यांना दिले होते. परंतु आदेश मिळण्यापूर्वीच आघाडीच्या गोटात जाऊन बसलेल्या भोसले, िकशोर डागवाले, सुवर्णा जाधव वीणा बोज्जा या मनसे नगरसेविकांनी सावंत यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. महापौर निवडणुकीत पक्षादेश डावलून त्यांनी उघडपणे आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना मतदान केले.
पक्षादेश डावलणाऱ्या या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पत्र सावंत यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले. हकालपट्टीसह या नगरसेवकांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. आघाडीच्या गोटात दाखल झालेले मनसेचे स्वीकृत नगरसेवक कैलास गिरवले यांचीदेखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे पत्र डफळ यांनी दिले आहे. गिरवले यांना यापूर्वीच पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते, परंतु त्यांचे पक्षाचे सदस्यत्व कायम होते.
मनसे नगरसेवकांच्या हकालपट्टीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाध्यक्ष डफळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, मनसेचे गटनेते भोसले यांच्यापर्यंत पक्षादेश पोहोचला होता. परंतु त्यांना आदेशाप्रमाणे मतदान करायचेच नव्हते. त्यामुळेच ते पक्षादेश मिळाला नसल्याचा कांगावा करत आहेत. मनसेने दीड वर्षापूर्वी विकासाच्या मुद्यावर आघाडीला पाठिंबा दिला होता, परंतु पक्षाची निराशा झाल्याने युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनसे नगरसेवकांनी मात्र हा आदेश मानता आघाडीशी घरोबा केला. त्यामुळेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मनसेचे चारही नगरसेवक राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले गेल्याचा आरोपही डफळ यांनी केला. यावेळी गिरीश जाधव, नितिन भुतारे, सुमित वर्मा, मनोज राऊत आदी उपस्थित होते.
मनसे नगरसेवक भूमिका मांडणार
महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये घडलेल्या घडामोडींबाबत माहिती देण्यासाठी मनसे नगरसेवकांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद बोलावली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांबाबतही हे नगरसेवक बोलतील. त्यामुळे मनसे पदाधिकारी नगरसेवकांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर येणार आहे.
वरिष्ठांची भेट घेणार
- पक्षादेश पाळणाऱ्या मनसेच्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई कारवाई करण्यात आली आहे. आता त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी येत्या दाेन-तीन दिवसांत पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.''
सचिन डफळ, जिल्हाध्यक्ष, मनसे.