आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eye Donation Movement Implementing By Jalinder Borude

पदरमोड करून दिली सव्वा लाख नागरिकांना दृष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मागील २४ वर्षांपासून पदरमोड करून फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे नगर जिल्ह्यात नेत्रदानाची चळवळ राबवत आहेत. आतापर्यंत त्यांनी हजार १२३ शिबिरे घेऊन लाख २५ हजार ३३४ नागरिकांना दृष्टी मिळवून दिली आहे.
२४ वर्षांपूर्वी बोरुडे यांच्या आईला मोतिबिंदू झाला होता. त्यावेळी नगरमध्ये फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. बोरुडे यांची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. त्यामुळे आईच्या मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी त्यांना मोठी धडपड करावी लागली. आपल्यासारखी वेळ दुसऱ्यांवर येऊ नये, यासाठी बोरुडे यांनी नेत्रतपासणी शिबिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिले शिबिर १९९१ मध्ये त्यांनी नागरदेवळे (ता. नगर) येथे घेतले. त्यावेळी नेत्रआरोग्य शिबिराबाबत समाजात जागृती नव्हती. त्यामुळे केवळ २५ जण या शिबिरासाठी आले. त्यानंतर बोरुडे यांनी शिबिराबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिबिरात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत गेली. आता नगर जिल्हाच नव्हे, तर सोलापूर, धुळे, उस्मानाबाद, परभणी, घोटी, इगतपुरी येथील रुग्णही या शिबिरात सहभागी होऊ लागले आहेत. आता शिबिरात सहभागी होणाऱ्यांची संख्या एक हजाराहून अधिक असते.

बोरुडे हे जलसंपदा विभागात टेलिफोन ऑपरेटर या पदावर काम करतात. प्रारंभी त्यांना केवळ ३०० रुपये वेतन होते. त्यातील काही पैसे बाजूला ठेवून ते नेत्र शिबिरे घेत. आताही ते आपल्या पगारातून मोफत नेत्रतपासणीबरोबर मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे घेतात.
फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या २४ वर्षांत त्यांनी हजार १२३ िशबिरे घेऊन लाख २५ हजार ३३४ नागरिकांना दृष्टी मिळवून दिली आहे.
खिशाला झळ बसते, पण समाधान मिळते...
- एका शिबिरासाठी पाच ते सात हजार खर्च येतो. नेत्रतपासणी शिबिरांना कुठल्याही संस्थेचे अर्थसाहाय्य मिळत नाही. निस्वार्थी भावनेतून हे काम मी करत आहे. शिबिरे घेताना खिशाला झळ बसते, मात्र त्यातून समाधान मोठे मिळते. या वर्षी तब्बल ११३ शिबिरे घेतली आहेत. भविष्यात गोरगरिबांसाठी ५० खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचा प्रयत्न आहे.''
जालिंदर बोरुडे, अध्यक्ष, फिनिक्स फाउंडेशन.