आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवतीची बदनामी करणार्‍याला कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर । ‘फेसबुक’वर युवतीचे बनावट प्रोफाईल तयार करून तिची बदनामी व छेड काढल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी केडगावच्या युवकाला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
अंकित संजय माळवदे (19, भूषणनगर, केडगाव) याचे एका युवताशी छेडछाडीवरून भांडण झाले होते. त्या युवतीची व तिच्या आई-वडिलांची बदनामी करण्यासाठी अंकितने फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार केले. त्यावर युवतीचे काही ओरिजिनल, इतर स्त्री-पुरुषांचे ईल फोटो व ईल कॉमेंटस् टाकल्या. हा प्रकार दोन वर्षांपासून ऑक्टोबर 2011 पर्यंत सुरू होता.
मध्यंतरी त्या युवतीच्या आई-वडिलांनी तिचे लग्न जमवण्याचा प्रयत्न केला. याची कुणकुण लागताच अंकितने त्यांना फोन करून ही युवती काही मुलांसोबत पळून गेली होती, असे सांगितल्यामुळे लग्न मोडले. या प्रकारामुळे युवतीला व तिच्या घरच्यांना मानसिक त्रास झाला. त्यामुळे तिने मंगळवारी दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अंकितविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये, तसेच छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल केला. बनावट अकाऊंट जेथे तयार केले तो ‘सायबर वर्ल्ड’ हा नेटकॅफे व तेथे बसण्याची जागा अंकितने पोलिसांनी दाखवली. पोलिसांनी अकाऊंटच्या प्रिंट काढून दोन सीपीयू जप्त केले. पोलिसांनी मंगळवारी रात्री अंकितला अटक केली. त्याला 2 दिवस पोलिस कोठडी मिळाली.