आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस-विखे मैत्रीवर जनतेनेही केले शिक्कामोर्तब...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. शिर्डीच्या कार्यक्रमात या मैत्रीवर जनतेनेही शिक्कामोर्तब केले. अंतिमत: काहीतरी झाले पाहिजे, पण त्याबाबत माझ्यापेक्षा विखेच अधिक बोलू शकतील, असे पालकमंत्री राम शिंदे यानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

विखे भाजपत येणार का, असे विचारले असता शिंदे म्हणाले, कालच्या माझ्या भाषणातील संदर्भ वेगळा होता. विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते एकाच व्यासपीठावर येण्याचा प्रसंग आपल्या राजकीय आयुष्यात प्रथमच बघत असून विखे आपला वेगळा पक्ष असतानाही त्यांच्या परिवाराशी आपला जुना संबध अाहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यानंतर आपण विखे परिवाराशी ऋणानुबंध ठेवला आहे. मुख्यमंत्री फडणवीस विखेंची मैत्री सर्वश्रृत आहे. तथापि, विखे भाजप प्रवेश करणार की नाही हे मी सांगण्यापेक्षा त्यांनाच विचारलेले बरे होईल, असे सांगत अधिक भाष्य करण्याचे शिंदे यांनी टाळले. 

विखे म्हणाले होते...
शिर्डीतील विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी विखे यांनी मला आमच्या पक्षातील लोकांपेक्षा तुमच्या सरकारमधील मंत्री जवळचे मित्र वाटतात. तुमच्याकडे आल्यावर घरी आल्यासारखे वाटते, असे सांगून माझी मुख्यमंत्र्यांची मैत्री तुम्हाला पसंत आहे का, असा प्रश्न जनतेला केला. जनतेनेही हात उंचावत या मैत्रीला संमती दर्शवली. समन्यायी पाणीवाटपाचा कायदा एका विशिष्ट परिस्थितीत आला. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण आमच्याच सरकारमधील नेत्यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी त्यातून मार्ग काढला नाही. त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या भागातील शेती संकटात आली. निळवंडे धरण पूर्ण झाले, पण कालवे अपूर्ण ठेवण्यामागे जाणीवपूर्वक राजकारण केले गेले. 
 
केवळ विखेंची जिरवण्यासाठीच निळवंडेच्या प्रश्नाचे राजकारण आमच्याच लोकांनी केले. वास्तविक म्हाळादेवी धरणाची मुहूर्तमेढ बाळासाहेब विखे यांनी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना रोवली. या धरणाला मंजुरीही मिळवली, पण या कामाचे श्रेय विखेंना जाऊ नये म्हणून धरणाची जागा जाणीवपूर्वक बदलली. म्हाळादेवीऐवजी निळवंडे करण्यात आले. त्यालाही आम्ही पाठिंबाच देऊन कालव्यांच्या कामासाठी आग्रही राहिलो. त्यानंतरही या भागातील लोकांना पाण्यावाचून वंचित ठेवण्याचे छडयंत्र रचले गेले. गोदावरीच्या कालव्यांना शंभर वर्षे झाली. त्यांच्या नुतनीकरणाकडेही सातत्याने दुर्लक्ष केले गेले. अाता मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी करताच उपस्थितांनी टाळ्या समर्थन दिले. 

मुख्यमंत्री काय म्हणाले...
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काम करत असताना मी माझी, तर विखे त्यांची विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका प्रामाणिकपणे बजावतात. लोकशाहीच्या मजबुतीसाठी विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्त्वाची असते. प्रसंगी आम्ही दोघेही एकमेकांवर टीकेचा भडिमार करतो. आमची मैत्री तर सर्वश्रृत आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू, पण आम्ही मैत्रीही चांगल्याप्रकारे निभावतो. राज्याच्या इतिहासात विखे यांच्यासारखा स्वच्छ प्रामाणिक विरोधी पक्षनेता आपण यापूर्वी कधीच पाहिला नाही. ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न माझ्याकडे मांडत असतात. त्यांनी कधीही चुकीचे काम माझ्याकडून करून घेतले नाही.  
बातम्या आणखी आहेत...