आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची शिर्डीत कारवाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिर्डीत स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून 2 लाख 12 हजार रुपयांच्या बनावट नोटा सोमवारी सायंकाळी जप्त केल्या. याप्रकरणी सिन्नर तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बनावट नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.

अरुण देवराम पवार (30, निमगाव देवपूर, ता. सिन्नर) व रामेश्वर किसन शेळके (30, पांगरी खुर्द, ता. सिन्नर) अशी आरोपींची नावे आहेत. बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दोघे शिर्डीला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला. नगर-मनमाड रस्त्यावर हॉटेल किनारासमोर बजाज बॉक्सर मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांचा संशय आल्याने पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याकडे 1 लाख 76 हजारांच्या बनावट नोटा सापडल्या. 500 व 1000 रुपयांच्या या नोटा आहेत. बनावट नोटा, मोटारसायकल व तीन मोबाइल असा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना अटक करण्यात आली. यासंदर्भात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्कॅनर, प्रिंटरच्या माध्यमातून गोरखधंदा- स्कॅनर व प्रिंटरचा वापर करून बनावट नोटा तयार केल्याची कबुली आरोपींनी दिली. नंतर सिन्नर तालुक्यातील निमगाव येथे छापा टाकून स्कॅनर, प्रिंटर, 36 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा, तसेच अर्धवट प्रिंट केलेले कागद जप्त करण्यात आले. एकूण 2 लाख 12 हजार रुपयांच्या बनावट नोटा व 26 हजार रुपये किमतीचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.