आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कचरा डेपोतील कामांबाबत चव्हाण यांचे आरोप बिनबुडाचे - महापौर अभिषेक कळमकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या बुरूडगाव सावेडी येथील कचरा डेपोतील कामांबाबत नगरसेवक दीप चव्हाण यांनी शुक्रवारी (११ मार्च) महासभेत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कचरा डेपोतील झालेली कामेच प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. या कामांची पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी खोटे आरोप करून दिशाभूल केली, असा खुलासा महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार बुरूडगाव सावेडी येथील कचरा डेपोतील विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ही कामे करण्यात येणार आहेत. या कामांना मंजुरी घेण्यासाठी महापौर कळमकर यांनी शुक्रवारी विशेष सभा बोलावली होती. प्रस्तावित कामे सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. परंतु नगरसेवक दीप चव्हाण यांनी या प्रस्तावित कामांबाबत आक्षेप घेत प्रशासन सत्ताधाऱ्यांवर आरोप केले हाेते. प्रस्तावित करण्यात आलेली कामे यापूर्वीच झालेली आहेत. त्यामुळे या कामांना मंजुरी देण्यात येऊ नये, अशी मागणी चव्हाण यांनी सभागृहात केली होती.
दरम्यान, सभागृहात या कामांना मंजुरी देण्यात आल्याने चव्हाण यांनी मंजुरीचा ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवावा, अशी मागणी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली हाेती. चव्हाण यांचे आराेप खोडून काढण्यासाठी महापौर कळमकर, माजी आमदार दादा कळमकर, स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले, नगरसेवक कैलास गिरवले यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी मंगळवारी बुरूडगाव सावेडी येथील कचरा डेपोची पाहणी करून विविध कामांबाबत माहिती घेतली. पाहणीसाठी चव्हाण यांना महापौर कळमकर यांनी आमंत्रित केले होते, परंतु त्यांनी पाहणी करण्यास येण्याचे टाळले. चव्हाण यांनी केलेले आराेप बिनबुडाचे असल्याचा खुलासा महापौर कळमकर यांनी नंतर पत्रकार परिषदेत केला. बुरूडगाव कचरा डेपोत प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी मनपाने जिल्हा प्रशासनाकडे साडेचार कोटी रुपये जमा केले आहेत. या निधीतून प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.

चव्हाण यांनी राजीनामा द्यावा
बुरूडगावलागटाराचे काम झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले, तर नगरसेवकपदाचा राजीनामा देईन, असे आव्हान नगरसेवक दीप चव्हाण यांनी भर सभागृहात दिले होते. कचरा डेपोची पाहणी केली, तेव्हा बुरूडगावला गटाराचे काम झाले असल्याचे स्पष्ट झाले. या कामाची छायाचित्रे काढली आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा टोला दादा कळमकर चव्हाण यांना पत्रकार परिषदेत लगावला.

प्रशासनाने उत्तर दिले नाही
चव्हाणयांनी सभेत प्रस्तावित कामांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना आयुक्त ढगे यांनी यांनी उत्तर देणे आवश्यक होते. चव्हाण यांचे आक्षेप प्रशासनाशी निगडीत होते. त्यामुळे आयुक्त ढगे यांनी चव्हाण यांच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे होते. परंतु तसे झाल्याने चव्हाण यांच्या आरोपांना पुष्टी मिळाली. चव्हाण यांचे आरोप बिनबुडाचे होते. त्यामुळेच प्रस्तावित कामांचा ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे कळमकर यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...