आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्‍ये कुटुंबाला जबर मारहाण करुन चोरी, पोलिसांना चकमा देऊन चोर फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - तालुक्यातील कोकणगाव शिवारातील शिंदेवस्ती हिरडगाव येथील चिंचकूट वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री चोरांनी हल्ला केला. चिंचकुटवस्तीवरील हरिभाऊ भाऊसाहेब दरेकर (३५) त्यांची पत्नी राणी, तर कोकणगाव शिवारातील शिंदेवस्तीवरील संतोष संपत शिंदे त्यांचे वडील संपत अंकुश शिंदे हे पिता-पुत्र जखमी झाले. संतोष यांच्या आईलादेखील चोरट्यांनी मारहाण केली. राणी दरेकर यांचा हात फ्रॅक्चर झाला असून डोळ्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचे पती हरिभाऊ यांच्या डोक्याला मार लागला आहे.हिरडगाव फाट्यानजीक असलेल्या चिंचकूटवस्तीवर राहणारे दरेकर हे शेतकरी कुटुंब आहे.
 
हरिभाऊ हे आई, वडील, पत्नी दोन लहान मुलांसह वस्तीवर राहतात. नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून साडेदहाच्या सुमारास ते झोपले. हरिभाऊ, त्यांची पत्नी दोन्ही मुले हॉलमध्ये झोपले होते, तर आई-वडील दुसऱ्या बेडरूममध्ये झोपले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास चोरट्यांनी हॉलचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून दरेकर यांच्या पत्नीच्या उषाशेजारील पहिल्या बेडरूमची चावी घेऊन बेडरूमचे कुलूप उघडले. कपाटाचा आवाज आल्यामुळे दरेकर पती-पत्नी जागे झाले. त्यांच्या उशाला उभे असलेल्या दोघा चोरट्यांनी लोखंडी गज, टॉमीने हरिभाऊंयांच्या डोक्यात, तोंडावर, पायावर मारहाण केली. त्यांच्या पत्नी राणी यांना डोक्यात उजव्या हातावर, तोंडावर गजाने मारले. एकाने दरेकर यांच्या मोबाइलमधील सीमकार्ड काढले. दरेकर यांनी आरडाओरडा केल्यावर चोर पळाले. आजूबाजूचे लोक जमा झाल्यावर त्यांनी दरेकर यांच्या पत्नीला श्रीगोंदे येथील खाजगी रूग्णालयात नेले.

पेट्रोलिंग करणारे पोलीस तातडीने घटनास्थळी जाण्यासाठी निघाले, पण त्यांना वस्तीवर जाण्याचा रस्ता माहीत नव्हता. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर अन्य तिघांना गाडीत घेऊन ते घटनास्थळी निघाले. गाडी हिरडगाव फाट्यानजीक गेली असता कोकणगाव परिसरात चोरटे दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसगाडी त्या दिशेने गेली. गाडीच्या उजेडात घराच्या मागच्या बाजूला एकजण डोकावून पाहताना दिसला. पोलिसांना काही समजण्याच्या आतच चौघेजण तेथून पळाले.
 
बातम्या आणखी आहेत...