आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेततळ्यांना 75 टक्के अनुदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे - ठिबक सिंचनाकरिता सन 2011-2012 साठी शासनाकडून 700 कोटी रुपयांची सबसीडी लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यात 10 हजार शेततळे बांधण्यात येणार असून त्यासाठीच्या प्लास्टीक कागदासाठी 75 टक्के अनुदान दिले जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
विखे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी (13 ऑगस्ट) आढावा बैठक व जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे जिल्हध्यक्ष जयंत ससाणे उपस्थित होते.
विखे म्हणाले, अधिकार्‍यांनाच अनेक योजनांची माहिती नसल्याने 86 हजार शेतकरी असलेल्या तालुक्यात केवळ 242 शेतकर्‍यांनी पीकविमा उतरवला आहे. तालुक्यात शेतकरी गट स्थापन झालेले नाहीत. पाणी योजना बंद असताना दुरुस्तीची कामे होत नाहीत. आदेश धुडकावून शहरात वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात केवळ 8 कूपनलिका खोदल्या असून त्यावर पंप नाहीत. याला अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. खतांचा काळाबाजार करणार्‍यांवर फौजदारी दाखल करावी, जि. प. अध्यक्षांनी जिल्हाभर दौरे करताना तालुक्यातील पाणीटंचाईवरही लक्ष द्यावे, अशा सूचना विखे यांनी केल्या. प्रास्ताविकात अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. '