आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Farmer Association State President Raghunath Patil Comment On Leader

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...हे तर ‘लबाड कोल्हे’; राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- साखर कारखान्यांच्या उत्पन्नातील 70 टक्के वाटा ऊसउत्पादकांना द्यावा, अशी रंगराजन समितीची शिफारस आहे. याला विरोध करणारे नेते ‘लबाड कोल्हे’ आहेत, असा टोला शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांना सोमवारी पत्रकार परिषदेत लगावला.

पाटील म्हणाले, शेतकर्‍यांना त्यांचा रास्त हिस्सा मिळावा, असा रंगराजन समितीचा आग्रह आहे. कारखान्यांच्या उत्पन्नातील 70 टक्के वाटा शेतकर्‍याला देऊन उर्वरित 30 टक्के रकमेत कारखाना चालवावा. कारण आता मार्केटिंग करण्याचा अधिकार कारखान्यांना मिळाला आहे. साखरेबाबत प्रत्येक राज्याने वेगळे धोरण घेतल्यास देशाचे एक धोरण राहणार नाही. रंगराजन समितीबाबत नवीन समिती स्थापन करण्याचा आचरटपणा सरकारने सुरू केला आहे. वास्तविक या शिफारशी चांगल्या असून त्या केंद्राने लागू करायला हव्यात.

शेतकर्‍यांची बिले थकली आहेत. तोटा होऊन काही बँका बंद पडत आहेत. पण शेतकर्‍यांचे नाव पुढे करून याच बँकांना सरकारी तिजोरीतून पैसे दिले जातात. बँका आणि सहकारी संस्था बंद पाडणार्‍या गुन्हेगारांना शिक्षेऐवजी सरकारकडून बक्षिसी मिळते. सत्ताधारी व विरोधक या मुद्यावर आक्रमक होत नाहीत. कारण त्यांनी वाटून खाण्याचा उद्योग सुरू केला आहे. रंगराजन समितीच्या पहिल्या दोन मुद्दय़ांबाबत कोल्हे काहीच बोलत नाहीत. कारखान्याचा खर्च शेतकर्‍यांच्याच उत्पन्नातून काढला जातो. 70 टक्के रक्कम शेतकर्‍यांना देणे जिल्ह्यातील कारखान्यांना हे अवघड आहे, असे म्हणणारे कोल्हे लबाड आहेत.

आमदार व खासदारांची संख्या ठरावीक असल्याने इतर कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी त्यांची व्यवस्था केली जाते. अशा उपद्रवींसाठी बाजार समित्या, साखर कारखाने उघडून दिले जातात. जनजागृतीसाठी 9 ऑगस्टला सहकार परिषद, 25 ऑगस्टला लोणीत पणन परिषद, तर 8 सप्टेंबरला परळीत विश्वासघात परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.