आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी औषध घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नापिकीला कंटाळून मुलीच्या लग्नाचे कर्ज झाल्याने तालुक्यातील जोतिबावाडी येथील शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली. संभाजी ज्योती पवार (४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा तीन भाऊ असा परिवार आहे.

पवार हे बुधवारी रात्री ११ वाजता विहिरीवरील मोटार सुरू करतो, असे सांगून गेले होते.गुरुवारी सकाळी त्यांचा चुलतभाऊ बापू चंद्रभान पवार शेतात गेला असता त्यांना संभाजी विषारी औषध पिल्याने मृत झाल्याचे आढळले. संभाजी यांच्या मुलीचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. या लग्नात कर्ज झाले होते. त्यांच्याकडे सोसायटीचे ७५ हजार कर्ज होते. गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने सोसायटीचे खासगी कर्ज त्यांना फेडता आले नाही. यावर्षीही या भागाकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे कपाशी खरिपाची पिके वाया गेली.
बातम्या आणखी आहेत...