आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याची आत्महत्या, आढाववाडी येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर तालुक्यातील आढाववाडी परिसरात एका शेतकऱ्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला. शंकर जगन्नाथ घोरपडे (४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आढाववाडीचे सरपंच संतोष झिने यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घोरपडे यांनी घरासमोर असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ नुसार आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पोलिस नाईक बर्डे अधिक तपास करीत आहेत.

मराठवाड्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातही आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण पसरले आहे. चार दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथेही संजय परभाणे या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. दुष्काळी उपाययोजना करूनही शेतकऱ्यांच्या अडचणी सुटत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.