आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Died In House Breaking In Shrigonda Taluka

श्रीगोंदा तालुक्यातील दरोडेखोरांच्या हल्लय़ात शेतकरी ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - दरोडेखोरांनी केलेल्या हल्लय़ात वडाळी येथील शेतकर्‍याचा मंगळवारी पहाटे जागीच मृत्यू झाला.दरोडेखोरांनी दोन दुचाकी, दोन मोबाइल व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. मारुती किसन वागस्कर (56) असे मृताचे नाव आहे.

वागस्कर यांच्याकडे रॉकेल विक्रीचा परवाना आहे. किराणा दुकानातून ते परवानाधारकांना विक्री करत. सोमवारी रात्री जेवण आटोपून ते झोपले. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास पाच ते सात दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करून वागस्करांना लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध पडले. नंतर दरोडेखोरांनी गल्ल्यातील रोख रक्कम, दोन मोटारसायकली व दोन मोबाइल घेऊन पोबारा केला. दरोडेखोरांनी दगडफेक करून दहशत निर्माण केली. उपचारासाठी नगरला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. श्वानपथकाने कुकडी कालव्यापर्यंत माग काढला. पोलिस उपअधीक्षक धैर्यशील पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन सूचना दिल्या.
दरोड्यापूर्वी गावातील वीजपुरवठा बंद
दरोडा टाकण्यापूर्वी गावातील वीजपुरवठा बंद झाला होता. ही बाब तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. हा प्रकार दरोडेखोरांनी केला की, पूर्ववैमनस्यातून काटा काढण्यासाठी हा बनाव रचण्यात आला यादृष्टीने तपास सुरू आहे.